Important Diagnostic Tests For Women | चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी ‘या’ चाचण्या करायलाच हव्यात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज जगभरात प्रत्येक क्षेत्रात महिला या आघाडीवर आहेत. मात्र आरोग्याच्या (Important Diagnostic Tests For Women) बाबतीत त्यांच्यापुढे अनेक समस्या उभ्या आहेत. आजच्या जागतिक महिला दिनी महिलांच्या आरोग्य समस्यांवर (Important Diagnostic Tests For Women) चर्चा करणार आहोत.

 

वय वाढते तसतसे महिलांपुढील समस्या वाढत जातात. यावेळी नियमित आरोग्य तपासणी (Health Checkup) करण्याची सवय जर लावून घेतली तर अनेक गंभीर आजारांच्या (Serious Illness) धोक्यापासून आपण आपले संरक्षण करू शकतो. वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने दरवर्षी चाचणी (Checkup) करून घेणे आवश्यक आहे. त्यात निष्पन्न झालेल्या आजाराला (Important Diagnostic Tests For Women) वेळीच आळा घालता येऊ शकेल.

 

थायरॉइडची समस्या (Thyroid Problem) –
आरोग्य तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार सुमारे ६०% भारतीय महिला (Indian women) थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त आहेत. गळ्यातील थायरॉइड (Throat Thyroid) ग्रंथीचे (Gland) कार्य नीट न झाल्याने हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम होतो. त्यामुळे संबंधित विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका (Health Problems Risk) वाढतो. वाढत्या वयात या समस्या उद्भवू नये म्हणून वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने दरवर्षी थायरॉईड उत्तेजक चाचणी (टीएसएच टेस्ट) करणे आवश्यक आहे. थायरॉईडच्या समस्येमुळे केस गळणे (Hair Fall), नैराश्य (Depression) आणि मासिक पाळीतील अनियमितता (Irregular menstruation) यासारख्या समस्या उद्भवतात.

 

कर्करोगाचा धोका (Risk Of Cancer) –
भारतात दरवर्षी ७४ हजारांहून अधिक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने (Cervical Cancer) दगावतात. या रोगाचे निदान व उपचार प्राथमिक अवस्थेत झाले तरच त्यातून बरे होता येते. हा कर्करोग मात्र दुसर्‍या टप्प्यात गेल्यावरच कळतो. ही मोठी चिंतेची बाब आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, विशेषत: सुदृढ महिलांसाठी दर दोन वर्षांनी एकदा पॅप स्मीयर चाचणी (Pap Test) करणे आवश्यक आहे. असे केल्याने, आपण कर्करोगाचा धोका टाळू शकतो.

रक्त तपासणी आवश्यक (Blood Tests) –
१५ ते ४९ वयोगटातील ५१ टक्के भारतीय महिला अ‍ॅनिमियाला (Anemia) (लाल रक्तपेशींचा अभाव) बळी पडतात,
असे २०१७ च्या सीबीसी टेस्ट एसेंशियल ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टमध्ये (CBC Test Essential Global Nutrition Report) असे आढळले आहे.
शरीर सशक्त राहावे आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव व्हावा, यासाठी लाल रक्तपेशीची नितांत गरज असते.
रक्तातील या पेशींचे प्रमाण तपासण्यासाठी नियमित पूर्ण रक्त गणना (सीबीसी चाचणी) महत्त्वपूर्ण आहे.

 

डोळ्यांच्या वाढत्या समस्या (Eye Problems) –
भारतीय स्त्रियांमध्ये अंधत्वाच्या समस्येचा धोका (Risk Of Blindness) पुरुषांपेक्षा ३५ टक्के जास्त असतो.
मधुमेहासारख्या (Diabetes) आजारांचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
ते टाळण्यासाठी महिलांनी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी (Eye Checkup) करून घ्यायलाच हवी.

 

Web Title :- Important Diagnostic Tests For Women | essential medical tests to be started in your 30s

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

International Women Day-Sarla Thukral | साडी नेसून उडणार्‍या पहिल्या भारतीय महिला पायलटची कहाणी रंजक

 

PORD vs SIP | 100 रुपये मंथली गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर कुठे होईल जास्त फायदा, पहा कॅलक्युलेशन

 

Income Tax Raid | मंत्री अनिल परब यांच्या CA च्या घरावर आयकर विभागाचा छापा