Improve Concentration While Study | तुमचं सुद्धा अभ्यासात लक्ष लागत नाही का? आळस दूर आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा ‘हे’ 5 उपाय…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अभ्यासादरम्यान आळस ही एक सामान्य समस्या आहे (Improve Concentration While Study). अनेकांना या समस्याशी सामना करावा लागतो. अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांच लक्ष विचलित होत. तसेच आळशीपणामुळे (Laziness) एकाग्रता (Concentration) कमी होते, त्यामुळे अभ्यास करावासा वाटत नाही. आपण काय वाचले, ते आठवत नाही. मात्र, काही सोप्या उपायांचा अवलंब करून पण आपला आळस दूर करू शकतो. तसेच आपली एकाग्रता सुद्धा वाढवू शकतो. जाणून घेऊया अभ्यास करताना आळस दूर करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्याचे 5 उपाय (Improve Concentration While Study).

  1. अभ्यासासाठी योग्य वातावरण निर्माण करा (Create Study Environment) – तुमच्या वाचनासाठी शांत, स्वच्छ आणि रोज बसता येईल अशी जागा निवडा. या ठिकाणी, तुम्हाला तुमच्या अभ्यासात कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागणार नाही आणि तुमचे संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर केंद्रित राहील, याची काळजी घ्या.
  2. अभ्यासासाठी स्वतःला प्रेरित करा (Motivate Yourself) – अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वतःला प्रेरित करा. तुमचे ध्येय लक्षात ठेवा आणि तुम्ही जे वाचत आहात ते तुमच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे समजून घ्या.
  3. वाचनाचे प्रभावी तंत्र वापरा (Use Effective Reading Techniques) – रट्टा मारण्याऐवजी समजून घेऊन अभ्यास करा. संकल्पना समजून घेण्यासाठी फोटो, तक्ते आणि इतर उपयुक्त साहित्य वापरा.
  4. नियमित ब्रेक घ्या (Take Regular Break) – सतत बराच वेळ अभ्यास केल्याने थकवा आणि आळस येतो. म्हणून, प्रत्येक 45-60 मिनिटांनी एक छोटा ब्रेक घ्या. विश्रांती दरम्यान, फिरायला जा, पाणी प्या किंवा मन ताजेतवाने करणारे काहीतरी करा (Improve Concentration While Study).
  5. निरोगी राहा (Stay Healthy) – निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार (Nutritious Food), पुरेशी झोप (Enough Sleep) घ्या. तसेच नियमितपणे व्यायाम (Exercise) करा. निरोगी शरीर आणि मन तुम्हाला अभ्यासात चांगली एकाग्रता राखण्यास मदत करेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘ही’ समस्या असेल तर, आजपासूनच या लोकांनी खाऊ नका बाजरी…

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात