Side Effects Of Bajra | ‘ही’ समस्या असेल तर, आजपासूनच या लोकांनी खाऊ नका बाजरी…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | बाजरी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे (Side Effects Of Bajra). तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बाजरी अत्यंत गुणकारी आहे. बाजरी तुम्हाला निरोगी ठेवण्यास देखील मदत करते (Bajra For Healthy Body). मात्र काही ठराविक लोकांनी बाजरीच्या सेवनापासून पूर्णपणे दूर राहावे. बाजरीचे सेवन त्यांच्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते (Side Effects Of Bajra).

तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome), क्रॉन्स डिसीज (Crohn’s Disease) किंवा इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज (Inflammatory Bowel Disease) असेल तर तुम्ही बाजरीचे सेवन टाळावे. याचे सेवन केल्याने तुमच्या आतड्यांमध्ये आणि पोटात (Pain In Intestine And Stomach) वेदना होऊ शकतात.

तुम्हाला किडनीच्या कोणत्याही आजाराने (Kidney Problem) किंवा किडनीच्या जळजळीचा (Inflammation Of Kidney) त्रास होत असेल, तर तुम्ही बाजरीपासून दूर राहावे. यामुळे किडनीच्या समस्या आणखी वाढू शकतात.

तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर तुम्ही बाजरीचे सेवन करू नये. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया बिघडते. याशिवाय तुम्हाला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते (Side Effects Of Bajra).

तुम्ही बाजरीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर, थायरॉईड
ग्रंथी (Thyroid Glands) सक्रिय होण्याचा धोका असतो.
यामुळे तुम्हाला थायरॉईडच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

बाजरीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्सलेट मुबलक प्रमाणात असते.
ते शरीरात जमा झाल्याने किडनी स्टोनची (Kidney Stone) समस्या निर्माण होऊ शकते.
अशा परिस्थितीत बाजरीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने
किडनी स्टोनची समस्या (Kidney Stone Problem) उद्भवू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची कारवाई, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”ही पाहिली वेळ नाही, यापूर्वी माझ्या बहिणींच्या…”