काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील जहांगिर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान सातव यांची तब्येत खालावली होती. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही वाढ होत असल्याची माहिती डॉ. सत्यजितसिंग गील यांंनी ही दिली आहे. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी (दि.30) सलग दुसऱ्या दिवशी दुपारी रुग्णालयात जाऊन सातव यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांंनी सातव यांच्या तब्येतीची माहिती घेतली.

खासदार सातव यांना 19 एप्रिलला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी 22 एप्रिलला टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना 25 एप्रिलला जहांगिरमध्ये दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृती सूूधारणा होत आहे. उपचारासाठी म्हणून त्यांना कोठेही हलविणार नसल्याची माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली आहे. दरम्यान खासदार सातव यांच्या तब्येतीबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते नजर ठेवून आहे. त्यांच्याकडून सतत फोनच्या माध्यमातून सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरु आहे.