‘हा’ बॉलिवूड अभिनेता घटस्फोटाच्या मार्गावर, बायकोने घर सोडल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये लग्न जितक्या उत्साहात होतात तितक्याच लवकर घटस्फोट देखील होतात. यापूर्वी अरबाज-मलाईका, अर्जुन रामपाल-मेहेर, हृतिक रोशन- सुझान खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सिनेक्षेत्रात रंगल्या. मात्र आता बॉलिवूडपासून दूर असलेला अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे वृत्त काही इंग्रजी वृत्तपात्रांनी दिले आहे.

दोघांमधील वाद टोकाला
या दोघांमधील वाद टोकाला गेल्याने अवंतिकाने इमरानचे घर सोडले असून ती मुलीला घेऊन माहेरी निघून गेल्याची चर्चा आहे. इमरान आणि अवंतिका यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना एक मुलगी देखील आहे. आठ वर्षांपूर्वी ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. मात्र आता त्यांच्यात अनेक विषयांवरून वाद सुरु झाले आहेत. २०१५ नंतर इमरानला एकही चित्रपट मिळला नाही. सध्या त्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे. हा देखील त्यांच्यातील वादाच्या अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वाचा मुद्दा असल्याची चर्चा आहे. रोज रोजच्या या वादाला कंटाळून अवंतिकाने इमरानचे पाली हिल येथील घर सोडले असून ती माहेरी निघून गेली आहे. दरम्यान, या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी दोघांची कुटुंबे प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेता इमरान खान विषयी
अभिनेता इमरान खान अमीर खान याचा भाचा आहे. २००८ साली त्याने ‘जाने तू या जाने ना ‘ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. याकरिता त्याला फिल्म फेअरचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर त्याने आय हेट लव स्टोरीज़ (२०१०), देली बेली (२०११), मेरे ब्रदर की दुल्हन (२०११) यासारख्या चित्रपटात काम केले. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या अमीर खान अभिनित ‘क़यामत से क़यामत तक’ तसेच जों जीता वोही सिकंदर (१९९२) या चित्रपटात त्याने बालकलाकरांची भूमिका केली होती. काही चित्रपटात भूमिका केल्यानंतर मात्र आता बॉलिवूडपासून तो थोडा लांबच आहे.

Loading...
You might also like