UN हून परतताना हवेतच अडकले इम्रान खान, परत पाठवावं लागलं अमेरिकेला विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्रात संबोधित केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मायदेशी परतत होते. मात्र अचानकपणे त्यांना पुन्हा न्यूयॉर्कला पाठवण्यात आले. कॅनाडाच्या टोरंटोला खान यांचे विमान पुन्हा पाठवण्यात आले. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

इम्रान खान यांच्या विमानात अचानकपणे इंजिन बिघाड झाल्यामुळे त्यांना पुन्हा न्यूयॉर्कमध्ये जाऊन विमानाचे लँडिंग करावे लागले. विमानात नेमका टेक्निकल प्रॉब्लेम काय होता हे अद्याप सांगितले गेलेले नाही. मात्र विमानाचे लँडिंग टोरंटो येथे करण्यात आल्याचे निश्चित केले आहे. नेमका काय प्रॉब्लेम विमानात झाला असावा हे अद्याप जरी समजू शकलेले नसले तरी विमान दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र तोपर्यंत इम्रान खान यांना न्यूयॉर्कमध्येच थांबावे लागणार आहे.

या आधीही इम्रान खान ज्यावेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे विमान नव्हते. ते सौदी अरेबियात होते आणि तेथून त्यांनी सौदीचे क्राऊन प्रिंस सलमान यांचे प्रायवेट विमान वापरून अमेरिकेत येण्याचा प्रवास केला होता.

शुक्रवारी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात आपले विचार मांडले होते. त्यांचे हे भाषण चर्चेचा विषय ठरत आहे. कारण पाकिस्तानकडून जरी या भाषणाचे कौतुक होत असले तरी या भाषणामुळे मात्र जगभरात पाकिस्तानची निंदा केली जात आहे.

Visit : Policenama.com