पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान अमेरिकेत राहणार ‘यांच्या’ घरी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे २१ तारखेपासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी राजदुताच्या घरी राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. अमेरिकेतील महागड्या हॉटेलाच्या भाड्याचे पैसे वाचतील आणि दौऱ्याचा खर्च कमी होईल असा इम्रान खान यांचा विचार आहे.

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दहशतवाद्याला खतपाणी घालण्याच्या त्यांच्या धोरणामुळे त्यांना जागतिक आर्थिक संस्थाकडून मदत मिळण्यास अडचणी येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करत आहेत. त्यामुळेच त्यांनी हॉटेलमध्ये राहण्या ऐवजी अमेरिकेतील राजदुताच्या घरी राहणे पसंत केले आहे.
एखाद्या देशाच्या प्रमुख अमेरिकेतील विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची सुरक्षा हातळण्याची जबाबदारी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडे असते. तर वॉशिंग्टन शहर प्रशासनाकडून त्यांच प्रवास व इतर गोष्टींची काळजी घेतली जाते. अमेरिकेत दरवर्षी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान येत असतात. त्यामुळे वॉशिंग्टनमधील वाहतुकीला याचा फटका बसणार नाही यासाठी अमेरिकन फेडरल सरकार शहर प्रशासनासोबत मिळून काम करते.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ