ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप नंतर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत असताना आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर याने निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी म्हणजेच उद्या होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्डकपमधील ४५ वा सामना इम्रान ताहिरसाठी महत्वाचा असणार आहे. याच सामन्याबरोबर इम्रान ताहीर निवृत्ती स्वीकारणार असून हा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. इम्रान ताहिरने याविषयी निर्णय घेतला आहे. उद्या होणार सामना त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १०७ वा सामना असणार आहे.

याविषयी बोलताना ताहीर म्हणाला कि, दुसऱ्या संघांप्रमाणे आम्हीदेखील शेवटचा सामना जिंकून या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्या होणार सामना जिंकण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे. मी या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असून माझ्यासाठी हा खूपच भावनिक क्षण आहे. मी भाग्यशाली आहे कि, इतक्या वर्ष मला क्रिकेट खेळायला मिळाले जे माझे स्वप्न होते. या प्रवासात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार देखील त्याने मानले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेबाबत बोलताना तो म्हणाला कि,दक्षिण आफ्रिकेच्या संघाबद्दल मला जास्त काळजी नाही. कारण या संघात अनेक तरुण खेळाडू असून मला विश्वास आहे कि, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच चांगली कामगिरी करतील. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आपल्या सर्वांना हव्या असलेल्या ठिकाणी असेल.

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या इम्रान ताहीर याने दक्षिण आफ्रिकी महिलेशी लग्न केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आला आणि त्यानंतर तो आफ्रिकेकडूनच क्रिकेट खेळू लागला. फेब्रुवारी २०११ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून १०७ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने १७२ विकेट घेतल्या आहेत. तसेच २० कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ५७ विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अतिशय खराब झाली असून आपल्या ८ सामन्यांत त्यांना केवळ २ विजय मिळवता आले असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?