Electric Vehicle : तुमच्या शहरातही लवकरच सुरु होणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन; वाचा किती आहे संख्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेट्रोल-डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती भारतात केली जात आहे. पण या वाहनांना ‘चार्जिंग स्टेशन’ (Charging Station) ची गरज असते. त्यानुसारच आता दुसऱ्या टप्प्यात देशातील विविध राज्यात चार्जिंग स्टेशन सुरु करण्याची घोषणा केली आहे.

पहिल्या टप्प्यात अनेक चार्जिंग स्टेशन्सची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशातील 25 राज्यांमध्ये 2877 चार्जिंग स्टेशन सुरु केले जाणार आहेत. मात्र, कोणत्या राज्यात किती चार्जिंग स्टेशन्स सुरु केले जाणार आहेत, याची माहिती नसेल पण आता याबाबत सरकारने लोकसभेत माहिती देत या चार्जिंग स्टेशनसाठी 500 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. 10,000 किलोवॉटच्या क्षमतेचे चार्जिंग स्टेशनवरून सर्व ई-दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना चार्ज करता येऊ शकते.

महाराष्ट्रात 317 चार्जिंग स्टेशन्स

चार्जिंग स्टेशनबाबत लोकसभेत सरकारने दिलेल्या माहितीमध्ये सांगितले, की महाराष्ट्रात 317 चार्जिंग स्टेशन्स सुरु केली जाणार आहेत. तर केरळ 211, गुजरात 278, आंध्र प्रदेश 266, कर्नाटक 172, मध्य प्रदेश 235, राजस्थान 205, यूपी 207, तमिळनाडू 281, पश्चिम बंगाल 141 तर राजधानी दिल्लीत 72, बिहार 37 आणि चंडीगडमध्ये 70 चार्जिंग स्टेशन असणार आहेत.

25 राज्यांत 2877 स्टेशन्स

याशिवाय 25 राज्यांत 2877 चार्जिंग स्टेशन सुरु केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.