केरळात अजूनही १ हजार नागरिक पुरात अडकलेत

कोची : वृत्तसंस्था

 

केरळातील चेनगुन्नर परिसरातील सुमारे पाच गावांतील मिळून सुमारे एक हजार लोक अजूनही पुरात अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम मदत पथकांद्वारे सुरू आहे. तर दुसरीकडे समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशात अजूनही मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुरग्रस्तांना अन्न पुरविण्यासाठी नेव्हीच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. तसेच छोट्या विमानांचाही वापर करण्यात येत आहे.

देशातील सातवे सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ असलेले कोची विमानतळ पुरपरिस्थितीमुळे २६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुरग्रस्तांना अन्न, औषधे आणि पाणी पुरविण्यासाठी मदतपथके दिवसरात्र काम करत आहेत. काही भागात पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली असली तरी याठिकाणच्या लोकांना अन्न, पिण्याचे पाणी पुरविण्याची मोठी कामगिरी पार पाडावी लागत आहे. शिवाय साथीच्या रोगांनीही याभागात थैमान घातले आहे. विशेषता कोची आणि तिरूवअनंतपुरम येथे अनेक पुरग्रस्तांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. मध्य केरळातील त्रिसूर येथे मागील चोवीस तासात पाऊस पडलेला नसल्याने काही पुरग्रस्त आपआपल्या घरी परतू लागले आहेत. येथे काम करणाऱ्या मदतपथकांनी अजून मोठ्या प्रमाणात औषंधांची गरज भासत असल्याचे म्हंटले आहे. अन्न, औषधांची पाकीटे काही भागात हेलिकॉप्टरमधून टाकण्यात येत आहेत.
[amazon_link asins=’B079QTGHG3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a32578bc-a454-11e8-948e-33cbd992a391′]

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ३७०० वैद्यकीय केंद्रे केरळात सुरू केली आहेत. एखादा साथीचा रोग मोठ्याप्रमाणात पसरत असल्यास त्यास नियंत्रणात आणण्यासाठी ही केंद्र प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केरळातील काही भागात जारी करण्यात आलेला रेड अलर्ट रविवारी मागे घेण्यात आला असला तरी काही भागात ऑरेंज आणि येलो अ‍ॅलर्ट लागू करण्यात आला आहे.

केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, पुरग्रस्तांना पुरविण्यासाठी राज्याकडे पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे. बहुतांश महामार्ग पाण्याखाली असल्याने अन्न आणि अन्य साहित्य पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. अजूनही केरळातील ७ लाख पुरग्रस्त हे ५६४५ आश्रय केंद्रांमध्ये आहेत. सीमा सुरक्षा दलाची दोन मोठी जहाजे मदतीसाठी रविवारी तिरूवअनंतपुरममध्ये पोहोचली आहेत. साठ टन औषधांचा साठा आणि पुणे, मुंबईतील सत्तर डॉक्टर राज्याच्या राजधानीत पोहोचले आहेत.
पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या मच्छिमारांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. त्यांच्या सर्व बोटींना प्रत्येक दिवसाचे तीन हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केरळात ८ ते १५ ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा २५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे संबंधित विभागाने म्हटले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी आता ३५ धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B07B6DM75J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab09bbdc-a454-11e8-88cb-734f65bc31ab’]