महत्वाकांक्षी योजनांसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावेत : दिपक म्हैसेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

प्रधानमंत्री आवास योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत पुणे विभागाचे काम उत्कृष्ट होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी  जिल्हास्तरावर नगरपरिषदांच्या नियमित बैठका घेऊन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत विधानभवन येथे डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यावेळी योजनेचे राज्य समन्वयक दिलीप मुगळीकर, नगरपालिका प्रशासन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक प्रशांत खांडकेकर आदि उपस्थित होते.
[amazon_link asins=’B00ICCYF0E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ab223a8-8c2f-11e8-9203-7dd4354b53d3′]

यावेळी म्हैसेकर म्हणाले, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वत:चे घर मिळवून देण्यासाठी ही योजना अत्यंत चांगली योजना आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. या योजनेंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी  प्रयत्न करावेत. यासाठी ह्या प्रकल्पातील आवश्यक ते प्रशासकीय व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती माहिती घेवून  प्रकल्प वेळेत मार्गी लावावेत. या कामी हलगर्जीपणा करु नये, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याबाबत ऑगस्ट महिन्यात योजनेंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.