लोकसभेसाठी तिकिट हवयं? मग पहिल्यांदा २५ हजार जमा करा!

चेन्नई : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा तोंडावर असताना तमिळनाडूमध्ये सत्ताधारी एआयएडीएमकेकडून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी वेगळाच फतवा काढण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना प्रवेश अर्जासाठी २५ हजार रुपये अर्ज घेतानाच जमा करावे लागणार आहेत. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत, तर पाँडिचेरीमध्ये एक जागा आहे.

एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. येत्या ४ ते १० फेब्रुवारी पर्यत इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज उपलब्ध असणार आहेत. एआयडीएमके समन्वयक ओ. पनीरसेल्वम आणि संयुक्त समन्वयक के. पलानीस्वामी यांनी ही माहिती दिली. के. पलानीस्वामी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, पनीरसेल्वम उप मुख्यमंत्री आहेत.

एआयएडीएमकेने २०१४ च्या निवडणुकीत ३९ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यामुळे एआयएडीएमकेला इतके घवघवीत यश मिळाले होते. आगामी निवडणुकीत एआयएडीएमके पहिल्यांदाच नव्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणार आहे.

You might also like