‘त्या’ प्रियकरला मारण्यासाठी दिली १ कोटीची सुपारी

तेलंगाणा : वृत्तसंस्था

चार दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून पोलिसांनी बिहारमधून मारेकऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. २३ वर्षीय प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी या गँगला १ कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती.एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

हत्या करणाऱ्या टोळीचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना सुपारीच्या रक्कमेपैकी १८ लाख रुपये मिळाले होते. मुख्य मारेकरी गुजरातमधील माजी मंत्री हरेन पांडया यांच्या हत्येमध्येही सहभागी होता. दिवसाढवळया घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती.

[amazon_link asins=’B073T3DG4Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7821c976-bb5e-11e8-87f3-89e38848cda8′]

पाच महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नी अमृताला घेऊन स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेला होता. शुक्रवारी प्रणय कुमार नालगोंडा जिल्ह्यातील रुग्णालयातून पत्नी अमृतासोबत बाहेर पडला. त्यावेळी मारेकरी तिथे आला व त्याने प्रणयवर इसमाने मागून येऊन कोयत्याने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रणय जागीच कोसळला. पतीवर झालेल्या हत्येने अमृताही जागेवर बेशुद्ध झाली. अमृताने पोलिसांना दिलेल्या जबानीत तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता.

मिरयालगुडा येथील मारोतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मित्र प्रणयने नऊ महिन्यापूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलाकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण या दोघांनी कोणालाही भीक घातली नाही.अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता.

मारुती राव रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहेत. श्रीमंत-प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रणयशी लग्न केले होते. माझ्या कुटुंबाकडून धोका असल्यामुळे काही काळ आम्ही लपूनही राहिलो होतो. पण अशा प्रकारे हत्या करतील अशी अपेक्षा केली नव्हती असे अमृताने सांगितले. प्रणय आणि अमृताने जानेवारी महिन्यात लग्न केले होते.