वडाळा प्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल 

मुंबई:पोलीसनामा  ऑनलाईन

मुंबईतील वडाळा  येथील खोदकाम प्रकरणी ‘दोस्ती’ बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत  काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स इस्टेटच्या कम्पाऊंड जवळ असलेला मोठा भाग सोमवारी पहाटे कोसळला. त्यात जवळजवळ १५ कार दबल्या होत्या. शेजारी सुरु असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याप्रकरणी ‘दोस्ती एकर्स’ ला महापालिका अधिकाऱ्यांना  पाठीशी घेतल्याने हा प्रकार झाला असल्याचा आरोप स्थनिकांकडून केला जात आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’12b492b8-7884-11e8-93e8-fb29d2bf74b7′]

पोलिसांनी या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम २८७, ३३६, ४३१ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी  लॉईड इस्टेट लगतच्या जागेत यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने मानवी जीवास धोका निर्माण होईल असे जाणिवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम सुरू केले. यामुळे जीवास धोका निर्माण करणे तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली .