‘या’ कारणामुळे नारायण राणेंचे भाजपसमोर लोटांगण 

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची केस सुरू आहे. नारायण राणेंची ज्यावेळी मनी लॉँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी भाजपसमोर लोटांगण का घातले, याचे त्यांनी आधी उत्तर द्यावे. त्यांना तुरुंगात जाण्याची तसेच त्यांच्या कंपन्यांच्या चौकशीची वेळ आल्यानेच ती थांबविण्यासाठी ते भाजपकडे धावले. असा आरोप शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केला.

रत्नागिरी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाहीत. जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झालेली आहे. सेना भाजपबाबत जे बोलली, ते वागणे, बोलणे, ती टीका भाजपाचे कार्यकर्ते विसरणार नाहीत.

एकत्र आले तरीही मने जुळणार नाहीत. काल कुठेही उत्साह नव्हता. कार्यकर्ते बाहेर उभे होते. युती झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे अभिनंदनही केले नाही. जशी युती झाली तसे कार्यकर्ते घरी गेले. तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना, अशी या युतीची अवस्था झाली आहे. अशी टीका केली होती. दरम्यान या टीकेला प्रतिउत्तर देतांना नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची केस सुरू आहे. नारायण राणेंची ज्यावेळी मनी लॉँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी भाजपसमोर लोटांगण का घातले, याचे त्यांनी आधी उत्तर द्यावे. त्यांना तुरुंगात जाण्याची तसेच त्यांच्या कंपन्यांच्या चौकशीची वेळ आल्यानेच ती थांबविण्यासाठी ते भाजपकडे धावले. असा आरोप शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केला.

You might also like