नागपुर विभागात पकडले पहिल्या दिवसी बारा कॉपीबहाद्दर

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन – दहीवीची परीक्षा शुक्रवार पासुन सुरु झाली असून, यात नागपुर विभागातील बारा कॉपीबहाद्दर पहिल्याच दिवसी पकडण्यात आले. या विभागातुन १ लाख ६८ हजार विद्यर्थांनी परीक्षा दिली. मात्र काही परिक्षा केंद्रांवर हॉल तिकीटांन मध्ये चुका आढळुन आल्या.

पहिल्या दिवसी प्रथम भाषेचा पेपर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झाला. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्डाने ४५ भरारी पथक व ११ स्कॉड्स तयार केले आहेत. या दरम्यान पथकाच्या तपासणीत बारा कॉपीबहाद्दर आढळुन आले. भंडारा येथे सर्वात जास्त दहा विद्यार्थी कॉपी करतांना सापडले. हॉल तिकीटामध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी काही केंद्रावर आढळुन आल्या आहेत. यात परीक्षार्थीचे जेंडर बदलविणे, नावात स्पेलिंगची चुक असने,आदींचा यात समावेश आहे.

पुर्वी बोर्डा मार्फत लहान आकाराचे हॉल तिकीट दिल्या जात असे, मात्र यंदा बोर्डाने ए-४ आकाराचे हॉल तिकीट विद्यर्थांना देण्यात आले आहे. शाळेच्या चुकीमुळे काही हॉल तिकीटामध्ये चुका झाल्याचं स्पष्टीकरण बोर्डाने केले आहे.