ब्रम्होद्योग  २०१८  प्रदर्शन आणि संमेलन कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (ऋषिकेश करभाजन)  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होद्योग – २०१८  प्रदर्शन आणि संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुण्यातील ऍग्रीकल्चर महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु झाला आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या ब्रम्होद्योग – १८ प्रदर्शन आणि संमेलन या कार्यक्रमाची सुरवात आज ( २५ ऑक्टोबर ) मातृशक्तीचा जागर या कार्यक्रमाने झाला. यात तब्बल दोन हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता. या कर्यक्रमाचे उद्घाटन  केंद्रीय उद्योग मंत्री गिरीराज सिंग , राज्यसभा खासदार अमर साबळे, पुणे महापौर,मुक्ता टिळक, ब्राह्मण महासंघाचे कुलगुरू वसंत गाडगीळ, ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी तसेच सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.
याचबरोबर २५ ऑक्टोबरला सायंकाळी वकील आघाडी मेळावा आयोजित करण्यात आला असून यात एक हजारहून अधिक वकील सहभाग घेणार आहेत. तसेच २७ ऑक्टोबर ला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकारांची बैठक होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे ब्राह्मण अस्मिता आणि बौद्धिक वैभव दाखवणे हे आहे.
 
विशेष म्हणजे हा कार्यक्रम ऍग्रीकल्चर च्या ५ एक्कर च्या प्रांगणात होणार आहे. यात २०० पेक्षा अधिक उद्योजकाचे स्टॉल लागणार आहेत. पाच दिवसीय या कार्यक्रमात एक लाखांपेक्षा जास्त ब्राह्मण वृंद येणार असल्याचे ब्राह्मण  महासंघाचे पदाधिकारी योगेश जोशी सोनपेठकर यांनी सांगितले.
जाहिरात