तब्बल ५० वर्षांनंतर आयकर कायद्यामध्ये होणार ‘हे’ बदल ; नोकरदारांना मिळणार ‘हा’ लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार आयकर भरणाऱ्या लोकांवरील कर भार कमी करू इच्छित आहे आणि कर भरणाऱ्या लोकांची संख्या वाढविण्यासाठी आयकराच्या रचनेत बदल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, आता असलेल्या कर कायद्यात दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पण अर्थसंकल्प २०१९ – २० च्या आधी जनतेच्या अपेक्षांमुळे याला स्थगिती देण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार नोकरी करणाऱ्या लोकांवरील कराचा भार कमी होऊ शकतो. त्याचबरोबर परतावा भरणे देखील सोप्पे होणार आहे.

अधिकाऱ्याने दिली माहिती

एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा नवीन कायदा जवळपास पूर्ण झाला आहे. या अर्थसंकल्पानंतर हा कायदा आणला जाईल कारण आमचे लक्ष्य सध्या वित्त विधेयकावर केंद्रित आहे. त्यांनी सांगितले की, मसुदा आताच आला तर अनावश्यक अपेक्षा वाढल्या जातात.

नोकरी करणाऱ्या लोकांना दिलासा

अधिकाऱ्याने संकेत दिले की, नव्या कायद्यानुसार फक्त नोकरी करणाऱ्या लोकांवरील कर कमी केला जाणार नाही तर परतावा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सोप्पी केली जाईल. यांमुळे करदात्यामध्ये वाढ होऊ शकते.

मोदींनी जुन्या कररचनेचा कायदा बदलण्याचे ठरवले

खूप वर्ष जुन्या असणाऱ्या आयकर कायद्यामध्ये बदल करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. फोर्सला रिपोर्ट देण्यासाठी २६ मे नंतर दोन महिन्याचा अधिक वेळ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा पाहिलं की आता असणारा कराचा कायदा ५० वर्ष जुना आहे. त्यामुळे या कायद्याला कालसुसंगत बनवण्यासाठी २०१७ मध्ये समितीची स्थापना केली होती.

हे आहेत टास्क फोर्सचे सदस्य

सीबीडीटी चे सदस्य अखिलेश रंजन टास्क फोर्स चे अध्यक्ष आहेत. टास्क फोर्सच्या सदस्यांमध्ये गिरीश आहूजा (चार्टर्ड अकाउंटेंट), राजीव मेमानी, मुकेश पटेल (प्रैक्टिसिंग टैक्स एडवोकेट), मानसी केडिया (कंसल्टेंट आईसीआरआईईआर) और जी. सी. श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयआरएस अधिकारी व अधिवक्ता) यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

You might also like