Income Tax भरणाऱ्यांना दिलासा, नोकरदारांना होणार फायदा! टॅक्‍स सवलत संबंधी नवीन आदेश जारी

नवी दिल्ली : Income Tax | केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर होण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी लोकांमध्ये अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता वाढत आहे. अर्थसंकल्पाकडून सर्वाधिक अपेक्षा नोकरदार आणि शेतकरी यांना असते. याशिवाय, प्राप्तीकर विभाग करदात्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नियम बदलत असते. आता विभागाने करदात्यांना उपचारासाठी मिळणाऱ्या रकमेवर प्राप्तिकरातून सूट दिली आहे. (Income Tax)

तक्रार निवारणासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा

याशिवाय प्राप्तीकर विभागाने कोरोनादरम्यान कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या मदतीच्या रकमेवरही कर सवलत दिली आहे. विभागातील कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी स्थानिक समित्या स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. याशिवाय, डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी प्राप्तीकर विभागाने अनेक प्रकारच्या सेवा आणि संबंधित फॉर्मचे डिजिटायझेशन केले आहे. आता तुम्हाला सर्व प्रकारच्या कामांसाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. (Income Tax)

ऑनलाइन उपलब्ध होतील १२३ पेक्षा जास्त फॉर्म

प्राप्तीकराशी संबंधित काम सुलभ करण्यासाठी विभागाकडून १२३ हून अधिक फॉर्म ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये कोरोना काळात उपचारासाठी मिळालेल्या रकमेवरही विभागाने करमाफी जाहीर केली आहे. कोविड काळात सर्व कुटुंबांना कोविडच्या उपचारासाठी मदत मिळाली होती.
आतापर्यंत त्यावर प्राप्तीकराची तरतूद होती. मात्र आता यातून दिलासा मिळणार आहे.

याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध करण्यासाठी एसओपीही जारी करण्यात आले आहे.
करदात्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘समाधान’ हे तक्रार पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

Web Title :-Income Tax | income tax deptt gave big relief to taxpayers tax exemption on corona treatment amount

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम