
Income Tax | नोकरदार वर्ग वाचवू शकतो टॅक्स; ‘या’ आहेत काही गुंतवणुकी ज्यामुळे टॅक्स सेव्ह करणे होईल सोपे
पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या देशात मोठा वर्ग हा नोकरदार अर्थात पगार घेऊन काम करणारा आहे. अनेक लोकांचे इन्कम हे महिन्याच्या पगारावर अवलंबून आहे. अशामध्ये नोकरदार वर्गाला देखील सॅलरीवर टॅक्स (Income Tax) भरावा लागतो. आपल्या देशात इन्कम टॅक्स भरायचे काही स्लॅब्स (Income Tax Slab ) आहेत अर्थात वर्ग आहे. यामध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला टॅक्स हा भरावा लागतो. पण अशा युक्त्या व स्किम आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचा सॅलरी इन्कम टॅक्स (Income Tax) वाचवता येऊ शकतो किंवा त्याची बचत करता येऊ शकते.
काही लोकांची सॅलरी ही टॅक्सेबल (Taxable Salary) असते तर काही लोकांची सॅलरी ही टॅक्सबेल नसते. इन्कम टॅक्स विभागातर्फे (Income Tax Department) काही गट किंवा स्लॅब करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार टॅक्सचे प्रमाण ठरते. जुन्या टॅक्स सिस्टिमनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणताही इन्कम टॅक्स लागू होत नाही. त्यामुळे कोणताही टॅक्स सॅलरीमधून कट होणार नाही.
पण जर वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या पुढे असेल तर मात्र सॅलरी टॅक्स लागू होतो. 2.5 लाख ते 5 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना 5% टॅक्स हा सरकारला द्यावा लागतो. आणि जर वार्षिक पगार 5 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान असते तर 20% सॅलरी टॅक्स देणे बंधनकारक आहे. जर कोणात्या नोकरदार वर्गाचे उत्पन्न हे 10 लाखच्या ही पुढे जात असेल तर वर्षाला 30% टॅक्स भरणा करावा लागतो. आपल्या देशात अशाप्रकारे टॅक्स स्लॅब्स (Indian Tax Slabs ) आहेत. मात्र काही गुंतवणूक करुन टॅक्स सेव्ह देखील करता येतो. सॅलरीमध्ये वाढ झाली असेल आणि ती आता स्लॅब मध्ये येत असेल तर काही इन्व्हेस्टमेंट करुन टॅक्स सेव्ह करता येईल.
कोणत्याही गुंतवणूकीमध्ये गुंतवणूक करणे हे प्रत्येकाला जोखमीचे वाटते. मात्र अशा काही इव्हेस्टमेंट आहेत ज्याचा वापर करुन आपण टॅक्स (Salary Income Tax) भरणे कमी करु शकतो. आणि टॅक्सची रक्कम वाचवू शकतो. यापैकी काही गुंतवणुकीची नावे जाणून घेऊया.
- Unit Linked Insurance Plan (ULIP)
- Sukanya Samriddhi Yojana (SSY)
- Public Provident Fund (PPF)
- Employee Provident Fund (EPF)
- Senior Citizen Saving Scheme (SCSS)
- National Pension Scheme (NPS)
- National Savings Certificate (NSC)
- ELSS Fund
- Life Insurance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | डॉक्टराचे अपहरण करुन घरी नेऊन 25 लाखांच्या रोकडसह 27 लाख रुपयांचा दरोडा
Pune Crime News | मैत्रिणीनेच घरातील दागिने नेले चोरुन; चेक देऊन केला बाऊन्स
Revolutionizing Reproductive Medicine: Exploring In-Vitro Gametogenesis (IVG)