Pune Crime News | डॉक्टराचे अपहरण करुन घरी नेऊन 25 लाखांच्या रोकडसह 27 लाख रुपयांचा दरोडा

पत्नी, मेव्हण्याने सुपारी दिल्याचा संशय, 10 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | कुत्रा आजारी असल्याचे सांगून व्हॅटरनरी डॉक्टरला (Veterinary Doctor) बोलावून त्याचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले. त्याला जबरदस्तीने त्याच्या घरात आणून सोन्याचे दागिने (Gold Jewelry), २५ लाख रुपये रोख असा २७ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार वडकीत घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका ४८ वर्षाच्या डॉक्टराने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१४/२३) दिली आहे. हा प्रकार वडकी येथील पवार वस्तीत बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्हेटनरी डॉक्टर आहेत. त्यांचा व पत्नीचा न्यायालयात घटस्फोटासाठी (Divorce) खटला सुरु आहे. त्यात मालमत्तेचा वादही आहे. त्यांना बुधवारी वडकी येथील पवार वस्तीत कुत्रे आजारी असल्याचे सांगून उपचारासाठी बोलावले. त्यानुसार ते तेथे गेले. तेव्हा १० जणांना विचारणा केली. त्यातील २ ते ३ जणांनी त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना दिवे घाटमार्गे वनपुरी आंबोडी, वाघापूर या ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. चाकूने हाताला दुखापत केली. पैसे कोठे आहेत, अस म्हणून गळ्याला व पोटाला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी व मेव्हण्याने सुपारी दिली आहे.

तुला आम्ही संपवून टाकणार आहे, अशी धमकी दिली. तू आम्हाला २० लाख रुपये दिले तर तुला आम्ही सोडू,
तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांच्या स्वत:च्या घरी आणले.
त्यांचा मोबाईल व घराच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या. घरातून २ लाख १० हजार रुपयाचे
सोन्याचे दागिने व रोख २५ लाख रुपये असे २७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतले.
त्यांना घेऊन चोरटे पुन्हा शिंदवणे घाटात आले. तेथे या डॉक्टरांना सोडून ते पळून गेले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून
पोलीस उपनिरीक्षक गोरे (PSI Gore) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dilip Dhole | मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बदली; संजय काटकर नवे आयुक्त