NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी कांद्याबाबत 6 प्रश्न विचारत सरकारला घेरलं, म्हणाले- ‘सरकारची अशी ही बनवाबनवी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर शुल्क (Onion Export Duty) आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर कांद्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केंद्र सरकार (Central Government) विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन कांदा प्रश्नावर सरकारची बाजू मांडली. मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ट्विट करुन सहा प्रश्न विचारत सरकारला चहूबाजूने घेरलं आहे. तसेच पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वेड्यात तर काढलं नाही ना? असा खोचक सवाल रोहित पवारांनी (NCP MLA Rohit Pawar) केला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकारची अशी ही बनवाबनवी सुरु आहे. ‘नाफेड’मार्फत अतिरिक्त 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता 17 ऑगस्ट 2023 रोजी. त्याच दिवशी 40 टक्के निर्यातशुल्क लादण्याचाही निर्णय झाला. दोन्ही निर्णय जाहीर झाले 20 ऑगस्ट 2023 रोजी. त्यानंतर निर्यात शुल्क विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली परिणामी राज्य सरकार खडबडून जागं झालं.

त्यानंतर आज राज्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांशी बैठक करतात, उपमुख्यमंत्री जपानमधून फोन करतात आणि केंद्र सरकार शेतकरी हितासाठी 2 लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचं ट्विटर वरून घोषितही करतात. त्यावर भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या 2 लाख टन कांदा खरेदी करण्याच्या निर्णयाचं अफाट कौतुक करतात.

जर 2 लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करण्याचा निर्णय तीन-चार दिवसांपूर्वीच झाला होता तर मग, राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आज दिल्लीला जाऊन नेमकी काय चर्चा केली? उपमुख्यमंत्री साहेबांनी जपानमधून फोनवरून केंद्रीय मंत्र्यांशी काय संवाद साधला? मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारचं कशाबद्दल कौतुक केलं? श्रेय घेण्याच्या नादात किती बनवाबनवी करणार?

तीन-चार दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा जाहीर करून पियुष गोयल साहेबांनी
राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ (Dhananjay Munde), उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब (Devendra Fadnavis),
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना वेड्यात तर काढलं नाही ना?
किंवा राज्य आणि केंद्र सरकार मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना?
असा प्रश्न पडलाय, अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी (NCP MLA Rohit Pawar)
राज्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना आता सत्ताधारी कशा प्रकारे उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न