Income Tax Returns | ITR फाइल करणाऱ्यांसाठी पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ४ लाखावरून १३ लाख उत्पन्न

नवी दिल्ली : Income Tax Returns | तुम्ही सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल केला असेल, तर ही बातमी माहित असणे आवश्यक आहे. पीएम मोदी (PM Narendra Modi ) म्हणाले, आयटीआर फायलिंगच्या (ITR Filing) आकडेवारीवरून असे दिसते की मागील नऊ वर्षांत सरासरी उत्पन्न तिप्पट झाले आहे (Income Tax Returns). यावरून दिसून येते की विविध क्षेत्रांमध्ये मजबूती आणि रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले, २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार (Corruption) आणि घोटाळ्यांचे (Scam) युग होते आणि गरिबांचे हक्क आणि पैसे लुटले जात होते. पण आता प्रत्येक पैसा थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जात आहे (Niti Aayog Report).

पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य, व्हिडिओ लिंकद्वारे मध्य प्रदेश रोजगार मेळाव्याला संबोधित करताना केले. नीती आयोगाच्या अहवालाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाच वर्षांत १३.५० कोटी भारतीय बीपीएल कॅटेगरीतून (Indian BPL Category) बाहेर आले आहेत. अमृत कालच्या पहिल्या वर्षातच सकारात्मक बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे, ज्या वाढती समृद्धी आणि कमी होत असलेली गरिबी दर्शवतात.

सरासरी उत्पन्न वाढून झाले तिप्पट
पंतप्रधान म्हणाले की, इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns) चा डेटा दर्शवितो की, मागील नऊ वर्षांत भारतीयांचे सरासरी उत्पन्न ४ लाख रुपयांवरून १३ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटाकडे जात आहेत. सर्व क्षेत्रांना बळ मिळत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

अर्थव्यवस्था १० व्या वरून ५ व्या स्थानावर
ते म्हणाले, लोकांचा विश्वास वाढत आहे. ते या विश्वासाने कर जमा करत आहेत की,
त्यांचा प्रत्येक पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल. देशाची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगातील १० व्या स्थानावरून आता
५ व्या स्थानावर पोहोचली आहे. २०१४ पूर्वी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या युगात गरिबांचे हक्क आणि त्यांचा पैसा
त्यांच्या खात्यात पोहोचण्याआधीच लुटला जात होता. आता एक-एक पैसा थेट त्यांच्या खात्यात जातो.

पंतप्रधान म्हणाले की, गुंतवणुकीने नवीन रोजगार निर्माण झाले असून २०१४ नंतर भारतात पाच लाख
नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर्स स्थापन झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
यावेळी नवनियुक्त ५ हजार ५८० शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | खळबळजनक! पोलीस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन

Personal Loan Interest Rates | पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय, या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजावर कर्ज

Tomato Price Update | नेपाळचे टोमॅटो आल्याने खाली आला भाव, किरकोळ बाजारात इतके रुपये किलो झाली किंमत