त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश !

पोलिसनामा ऑनलाईन – आपली त्वचा सुंदर असावी असे प्रत्येक महिलेला वाटते. यासाठी महिला विविध प्रकारच्या प्रॉडक्टचा वापर करत असतात, तसेच नियमितपणे ब्युटी पार्लरला जात असतात. तरूणांना सुद्धा आपली त्वचा चांगली असावी असे वाटते. जर त्वचा सुंदर आणि निरोगी हवी असेल तर केवळ बाह्य उपाय करून चालणार नाहीत. आंतरीक सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे त्वच्या सुंदर, तजेलदार आणि चमकदार बनते. कुठल्या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने त्वचा सुंदर होईल ते जाणून घेवूयात…

आहारात या वस्तूंचा करा समावेश

1 जवसाच्या बिया
आहारात जवसाचा समावेश करणे त्वचेसाठी खुप लाभदायक ठरते. जवसाच्या बिया तशाच कच्चा खाल्ल्यातरी चालू शकते. अथवा जवसाची चटणी देखील करून खाता येईल. दिवसांतून एकदातरी जवस खावेत.

2 सूर्यफूलाच्या बिया
त्वचेचे सौदर्य वाढचण्यासाठी सूर्यफूलाच्या बियासुद्धा खुप लाभदायक ठरतात. या बीयांमध्ये व्हिटमिन ए, बी आणि ई असते. तसेच टायग मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडेंट असते. हे घटक चेहर्‍यासाठी खुपच उपयुक्त ठरतात. आहारात सूर्यफूलाच्या बिया घेतल्यास त्वचेचे सौंदर्य उजळते.