विज स्थिर आकार शुल्कात दोन वर्षात तब्बल ५० टक्के वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
जून २०१६, १ एप्रिल २०१७, १ एप्रिल २०१८ आणि १२ सप्टेंबर २०१८ अश चार टप्प्यात राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला २०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चार टप्प्यांमध्ये वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यामुळे दोन वर्षात स्थिर आकार शुल्कात ५० टक्के वाढ केल्याचे स्पष्ट होत आहे. अलिकडे १२ सप्टेंबर २०१८ ला गणोशोत्सवापूर्वी दरवाढीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार घरगुतीच्या सिंगल फेज आणि थ्री फेज वाणिज्यिक ग्राहकांसाठीच्या स्थिर आकारात  मोठी वाढ झाली आहे.

विविध मागण्यांसाठी होमगार्डसचा गणेशोत्सव बंदोबस्तावर बहिष्कार

आयोगाने दिलेली दरवाढ कमी असली तरी छुप्या पद्धतीने वाढवलेले स्थिर आकार जास्त आहेत. देशात दिल्ली सरकारने प्रथमच २५ टक्के दर कमी करण्याचा प्रस्ताव तेथील वीज नियामक आयोगाला दिला आहे. त्यामुळे शासनाने तेथील वीज यंत्रणेचा अभ्यास करून हे दर कमी करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

[amazon_link asins=’B01D4EYNQA,B01D4EYNUG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78567765-b7e0-11e8-940e-699182cc5c26′]
१ एप्रिल २०१८ मधील घरगुती  सिंगल फेज ग्राहकांना ६५ रुपये स्थिर आकार होता. १ सप्टेंबर २०१८ च्या वीज देयकात हे दर ८० रुपये झाले. १ एप्रिल २०१९ मध्ये ते  ९०  रुपये होईल. यासंदर्भात माहिती देताना महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले, आयोगाने बारा महिन्यात तीन वेळा स्थिर आकार वाढवला असला तरी तो खूप कमी आहे. वास्तविक महावितरणचा देखभाल, दुरुस्तीवरील खर्च  वाढला आहे. या दरवाढीतून मिळणाऱ्या महसुलामुळे वीज सेवेचा दर्जा आणखी सूधारण्यास मदत होईल.