स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पोलिसनामा ऑनलाइन टीम – स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास अनेकांना भेडसावतो. ओव्हर बर्डन आणि जास्त बिझी असणारांची मेमरी तेवढीच जास्त कमजोर असते, असे तज्ज्ञ सांगतात. यासाठी दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही उपायांची माहिती घेवूयात. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम कसा फायदेशीर ठरतो.

३० मिनिटे व्यायाम करूनही स्मरणशक्ती सुधारता येते. यामुळे मेंदूची काम करण्याची पद्धतही बदलली जाऊ शकते. त्यामुळे डॉक्टर नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. साधारण अडीच तास सोप्या हालचाली म्हणजेच वेगाने चालणे किंवा गार्डनमध्ये स्वच्छता केल्याने वृद्ध वयस्करांचा मेंदू आणि शरीर निरोगी राहते. संशोधकांनी व्यायामाचा स्मरणशक्तीवर प्रभाव जाणून घेण्यासाठी ५० ते ५८ वयोगटातील सुमारे २६ वयस्करांचा अभ्यास केला असता असे आढळून आले की, केवळ तीस मिनिटांचा व्यायाम स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूचे कार्य वाढवतो. यामुळे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते.

६० पेक्षा अधिक वयाचे १३ टक्के लोक जेव्हा काही आठवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांना काहीही आठवत नाही. असे अनेकदा होते. अल्झायमरचा धोका वेगाने वाढत आहे. ६० ते ७० वयादरम्यान डोक्याच्या काही भाग आणि हिप्पोकॅम्पस आकुंचित होऊ लागतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते. स्मरण शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम सर्वात उपयोगी आहे.

शारीरिक हालचालीमुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. नियमित व्यायामाने मेंदूच्या पेशींवर सुरक्षात्मक प्रभाव पडतो. याने विचार करण्याची क्षमताही विकसित होते. यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे.