Ind Vs Aus : 12 वर्षानंतर भारतीय फलंदाजाचा नकोसा विक्रम, एकाच कसोटीत 3 फलंदाज रनआऊट

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळलेली येथे पहायला मिळाली आहे. परंतु, त्यात ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सचा वाटा कमी आहे. कारण पहिल्या डावात भारताचे तीन फलंदाज रनआऊट झाले आहेत. २००८ मध्ये मोहाली कसोटीत एका डावात तिघे जण रनआऊट झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनंतर ही घटना घडली आहे. आणखी एक नकोसा असलेला विक्रम भारताचा नावावर लागला आहे.

कसोटी सामन्यात रनआऊट होण्याचा प्रकार तसा दुर्मिळ असतो. तेथे ग्राऊंटवर टिकून राहून धावा जमवण्यावर सर्व फलंदाजांचा मुख्य भर असतो. त्यामुळे २० – २० किंवा एक दिवसीय सामन्यांप्रमाणे चोरटी धावा काढण्याचा प्रयत्न कमी होतो. पण, सध्याच्या फलंदाजांवर २० – २० आणि एक दिवसीय सामन्यांचा पगडा अधिक असल्याने ते कसोटीतही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यातून रनआऊट होत आहेत. ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताचे ४ फलंदाज रनआऊट झाले होते.

तिसर्‍या कसोटीत रवींद्र जडेजा याने पहिल्या डाव्यात स्ट्व्हि स्मिथ याला रनआऊट केले होते. अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर हणमंत विहारी फलंदाजीला आला. त्याने ४ धावा केल्या असताना एक अशक्य धावा घेण्याचा प्रयत्न केला. हेजलवूडने त्याला रनआऊट केले. त्यानंतर कमिन्सने दूरवरुन फेकलेला बॉल अचूक पकडून लाबुशेन याने रवींचद्र अश्विनला रनआऊट करुन तंबूत परत पाठविले. अश्विनने १० धावा केल्या होत्या. त्यानंतर जडेजा सोबत खेळत असताना जसप्रित बुमराहला लाबुशेनने रनआऊट केले. अशा प्रकारे एकाच डावात ३ खेळाडू रनआऊट होण्याचा हा २००८ नंतरचा पहिलाच प्रसंग आहे.