Ind Vs Aus : शार्दुल ठाकूरचा पर्दापणातच विक्रम; पहिल्याच चेंडुवर घेतला बळी

बिस्रेन : वृत्तसंस्था – टीम इंडियाकडून मैदानावर पर्दापण करणे हे कोणत्याही भारतीय खेळाडुसाठी आयुष्यातील मोठा प्रसंग असतो. त्यात जर पहिल्या कसोटीत आणि तेही पहिल्याच चेंडूवर तुमच्याकडून काही आगळे वेगळे घडले तर तो एक अविस्मरणीय प्रसंग ठरतो. असा अविस्मरणीय प्रसंग शार्दुल ठाकूर याच्या आयुष्यात आज घडला आहे. त्याने आज कसोटी पर्दापण केले़ आणि पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. एक विक्रम घडविला आहे. पर्दापणात पहिल्या चेंडूवर बळी मिळविणारा शार्दुल ठाकूर हा पहिला भारतीय खेळाडु ठरला आहे.

या आधी करर्सन घावरी याने पर्दापणात दुसर्‍या चेंडुवर बळी मिळविला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या दौर्‍यात भारतीय खेळाडु दुखापतीने त्रस्त झाले आहेत. रवीचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे दुखापतग्रस्त झाले असताना आहे त्या खेळाडुं शिवाय चौथ्या कसोटीला सामोरे जाण्याची वेळ कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर आली आहे. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी स्वीकारल्यानंतर सिराज याने पहिल्याच षटकात डेव्हीड वॉर्नरला माघारी पाठविले. सहाव्या चेंडुवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने अफलातून झेल घेत वॉर्नरला ४ धावांवर तंबूत पाठविले.

१९८५ नंतर गॅबा कसोटीत प्रथमच ऑस्ट्रेलियाने पहिल्या षटकात विकेट गमावली आहे. त्यानंतर ९ व्या षटकात अजिंक्य रहाणे याने गोलंदाजी करण्यास शार्दुल ठाकूर याला पाचारण केले. अन त्याने पहिल्याच चेंडुवर मार्कस हॅरिसला (५) वॉशिग्टन सुंदरकरवी झेल बाद केले. त्यानंतर कसोटीत पर्दापण करणार्‍या वॉशिग्टन सुंदर याने जम बसविलेल्या स्टिव्ह स्मिथ याला रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडून कसोटीतील पहिली विकेट मिळविली.ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. ऑस्टेलियाचे वृत लिहिपर्यंत ३५ षटकात ३ बाद ९१ धावा झाल्या आहेत.