Ind Vs Aus : सिडनी कसोटीत पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी, अजिंक्य रहाणेने खेळ थांबविला

सिडनी : वृत्तसंस्था –  ऑस्ट्रेलिया भक्कम स्थिती असताना प्रेक्षकांमधून चौथ्या दिवशी पुन्हा मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टिका करण्याचा प्रकार घडला. यामुळे काही वेळ खेळ थांबविण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडंना पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. त्याआधी तिसर्‍या दिवशीही प्रेक्षकांमधून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याची तक्रार भारतीय टीमने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि आयसीसी मॅच रेफ्री यांच्याकडे केली होती.

https://twitter.com/sahibjotvlogs/status/1348118948462485504?ref_src

मॅचच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद ३०१ धावा झाल्या असताना सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करणार्‍या मोहम्मद सिराज याच्यावर प्रेक्षकातून वर्णद्वेषी टीका करण्यात आली. त्याने ही बाब कर्णधार अजिंक्य राहणे याच्या कानावर घातली. सिराज आणि रहाणे यांनी मैदानातील दोन्ही अंपायरशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणाहून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली होती. तेथील प्रेक्षकांना सामना सोडुन जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला.