Ind Vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया तिसर्‍या कसोटीत पावसाचा व्यत्यय; ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, वॉर्नर तंबूत परतला  

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्याला सिडनी येथे आज सुरुवात झाली. मात्र काही वेळातच पावसामुळे खेळ थांबवावा लागला़ तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या (Ind Vs Aus)  १ बाद २१ धावा झाल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर याला मोहम्मद सिराज याने ५ धावांवर बाद केले. पहिलीच कसोटी खेळणारा विल पुकोवस्की १४ आणि लाबुशेन २ धावांवर खेळत असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे.

भारताकडून रोहित शर्मा याचे टीममध्ये पुनरागमन झाले आहे. नवदीप सैनी याचा संघात समावेश करण्यात आला असून तो कसोटी पर्दापण करीत आहे.

चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत व ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी १-१ सामने जिंकले आहेत. ही कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचे आव्हान दोघी संघापुढे आहे.