IND Vs BAN Weather Report | एडिलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश मॅच होणार? कसं असेल आजचे हवामान

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था – टीम इंडिया (India) आणि बांग्लादेशमध्ये (Bangladesh) आज एडिलेड ओव्हलच्या मैदानात (Adelaide Oval Ground) लढत होणार आहे. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या (ICC T-20 World Cup) सेमीफायनलमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी खेळतील. मात्र या सामन्यावर हवामानाचा (Weather ) परिणाम होऊ शकतो. मंगळवारी एडिलेडमध्ये जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे तिकडे थंडावा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

भारतीय चाहत्यांकडून करण्यात येत प्रार्थना

या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अनेक मॅच पावसामुळे रद्द झाल्या आहेत. सगळ्या टीमचे सेमीफायनलचे गणित बिघडले आहे. आज बांग्लादेश विरुद्ध टीम इंडिया मैदानात उतरेल, त्यावेळी पावसाने व्यत्यय आणू नये, अशी प्रार्थना चाहते करताना दिसत आहेत.

मॅचच्या दिवशी पाऊस कोसळणार?

मंगळवारी एडिलेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) झाला. त्यामुळे आज पाऊस कोसळण्याची 60 टक्के शक्यता आहे. मॅच संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. मॅचच्या वेळी पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने दिवसभर ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बुधवारी हवामान कसे असेल यावर सगळ्यांची नजर असणार आहे.

मॅच रद्द झाल्यास काय होणार?

भारत-बांग्लादेश सामना पावसामुळे झाला नाही, तर दोन्ही टीम्सना मोठा धक्का बसेल.
पॉइंटस टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेची (South Africa) टीम पहिल्या स्थानावर आहे.
टीम इंडिया तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराजयासह चार पॉइंटससह दुसऱ्या स्थानावर आहे.
बांग्लादेशचेही चार पॉइंटस आहेत. पण नेट रनरेटमध्ये भारत बांगलादेशपेक्षा पुढे आहे.
जर आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघाना आपला पुढचा सामना कोणत्याही परीस्थित जिंकावा
लागणार आहे. तोदेखील चांगल्या रनरेटने. जर दोन्ही संघानी आपले पुढचे सामने जिंकले तर ज्या संघाचा रन रेट
जास्त तो संघ पुढे वाटचाल करेल.

Web Title :-  IND Vs BAN Weather Report | india vs bangladesh 35th match pitch report in marathi adelaide oval adelaide weather forecast report live

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Loan | ग्राहकांना महा फटका! या तीन बँकांचं कर्ज महागलं, EMI आणि व्याजदरही वाढला

IND vs BAN | 4 वर्षापासून बांग्लादेशला सतावणाऱ्या ‘त्या’ कमजोरीचा टीम इंडिया उचलणार फायदा