IND vs NED | एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने फोडले फटाके, श्रेयस, राहुलची शतके; भारताचे नेदरलँड समोर 410 धावांचे आव्हान

एकाच सामन्यात टॉपच्या पाचही फलंदाजाची 50+ धावा, रचला आगळावेगळा पराक्रम

बंगळुरु : वृत्तसंस्था – भारत आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरु (M Chinnaswamy Stadium Bangalore) येथे खेळला जात आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या (World Cup 2023) स्पर्धेत सलग आठ सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया साखळी सामन्यातील शेवटचा सामना नेदरलँड्सोबत होत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. रोहित शर्मा (Rohit Sharma), शुबमन गिल (Shubman Gill), विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुलने (KL Rahul) तुफान फटकेबाजी करत नेदरलँड (IND vs NED) समोर 411 धावांचे कठीण लक्ष ठेवले आहे.

या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियाच्या शिलेदारांनी सार्थक ठरवला. टॉपच्या पाचही फलंदाजांनी एकाच सामन्यात 50+ धावा करत वर्ल्डकपमधील आगळावेगळा पराक्रम केला आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहितसह शुभमन गिल, विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केली. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. (IND vs NED)

रोहित आणि गिलने डावाची सुरुवात फटकेबाजी करुन करताना नेदरलँडची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी अवघ्या 11.5 ओव्हरमध्ये 100 धावांची सलामी दिली. शुभमन 51 धावा करुन बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा 61 धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस या जोडीने भारताच डाव सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. मात्र, विराट या सामन्यात आपले 50 वे शतक करेल असे वाटत असतानाच तो 51 धावांवर बाद झाला.

त्यानंतर पुन्हा एकदा श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी तुफान फटकेबाजी केली. भारताच्या पहिल्या पाचही फलंदाजांकडून अर्धशतकी खेळी झाली. हा वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा पराक्रम आहे. आजपर्य़ंत कोणत्याच संघाला असा पराक्रम करता आला नाही. मात्र, भारतीय संघाने ही कामगिरी एकदा नाही तर सहावेळा केली आहे. चालू वर्षात दुसऱ्यांदा ही कामगिरी केली आहे.

भारताची फलंदाजी

  • रोहित शर्मा (54 चेंडूत 61 धावा, 8 चौकार 2 षटकार)
  • शुभमन गिल (32 चेंडूत 51 धावा, 3 चौकार 4 षटकार)
  • विराट कोहली (56 चेंडूत 51 धावा, 5 चौकार 1 षटकार)
  • श्रेयस अय्यर (94 चेंडूत नाबाद 128 धावा, 10 चौकार 5 षटकार)
  • केएल राहुल (64 चेंडूत 102 धावा, 11 चौकार 4 षटकार)
  • सुर्यकुमार यादव (1 चेंडू नाबाद 2 धावा)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhavi Kapoor Saree Look | अबब..!! जान्हवी कपूरनं घातली तब्बल ‘इतक्या’ किमतीची साडी…