IND vs NZ 1st T20 | अर्शदीप सिंगच्या नावावर झाली ‘या’ दोन लाजिरवाण्या विक्रमांची नोंद

पोलीसनामा ऑनलाईन : काल भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 1st T20) यांच्यात पहिला T20 सामना पार पडला. या सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. हा सामना रांची या ठिकाणी पार पडला. या सामन्यात भारताच्या अर्शदीपने पहिल्या तीन षटकांमध्ये एकही नो बॉल न टाकता केवळ 24 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने शेवटच्या षटकांत 27 धावा देत दोन लाजिरवाणे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (IND vs NZ 1st T20)

अर्शदीपने एका षटकात दिल्या 27 धावा

अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. ज्यावर डॅरेल मिशेलने लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारला. यानंतर अर्शदीप सिंगने पुढील तीन चेंडूंत दोन षटकार आणि एक चौकारासह आणखी 16 धावा दिल्या. यानंतर शेवटच्या तीन चेंडूंमध्ये त्याने केवळ चार धावा दिल्या. याच धावा भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. या सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. यासह अर्शदीप सिंग 20 व्या षटकात भारताकडून सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.

अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात 27धावा देऊन माजी फिरकी गोलंदाज सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. सुरेश रैनाने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या षटकात 26 धावा दिल्या आहेत. एवढेच नाही तर एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीतदेखील अर्शदीप सिंग संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IND vs NZ 1st T20)

20 व्या षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय –
27- अर्शदीप सिंग 2023
26- सुरेश रैना 2012
24- दीपक चहर 2022
23- खलील अहमद 2018
23- हर्षल पटेल 2022

एका षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज –
34 – शिवम दुबे विरुद्ध न्यूझीलंड, 2020
32 – स्टुअर्ट बिन्नी विरुद्ध वेस्ट इंडिज, 2016
27 – शार्दुल ठाकुर विरुद्ध श्रीलंका, 2018
27 – अर्शदीप सिंग विरुद्ध न्यूझीलंड, 2023
26 – सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2012
26 – अर्शदीप सिंग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2022
25 – युवराज सिंग विरुद्ध न्यूझीलंड, 2007

Web Title :- IND vs NZ 1st T20 | arshdeep singh sets two embarrassing records with 27 runs in 20th over of t20 against new zealand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी

Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन