IND Vs NZ | विराट कोहली अन् रवी शास्त्रीच्या काळात करिअर संपलेल्या ‘या’ खेळाडूला रोहितनं दिली संधी; क्रिकेटर मिळालेल्या चान्सचं सोनं करणार?

जयपूर : वृत्तसंस्था – IND Vs NZ | काल झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) पहिल्या टी-20 मध्ये (IND Vs NZ) टीम इंडियाने (India) 5 विकेट आणि 2 बॉल राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेले 165 रनचे तगडे आव्हान भारताने 19.4 ओव्हरमध्येच पार केले. यामध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 62 रन, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 48 रन आणि ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद 17 रनच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडवर (IND Vs NZ) निसटता विजय मिळवला. त्याअगोदर भारताच्या भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांनी टिच्चून बॉलिंग करत आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 2 विकेट घेतल्या तर दुसरीकडे आर.अश्विनने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन देऊन 2 विकेट मिळवल्या.

 

 

विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या काळात अश्विनच्या मर्यादित ओव्हरच्या करियरला ब्रेक लागला होता. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (ICC Champions Trophy) अश्विनला वनडे आणि टी-20 टीममधून डच्चू मिळाला. यानंतर साडेचार वर्षांनी अश्विनचं टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं. यानंतर टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) अश्विनची भारतीय टीममध्ये निवड झाली, पण पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अश्विनला संधी देण्यात आली नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. अखेर तिसऱ्या सामन्यात अश्विनला संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत अश्विनने आपली क्षमता दाखवून दिली.

 

इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही विराट-शास्त्रींच्या जोडीने अश्विनला अंतिम-11 खेळाडूंमध्ये संधी दिली नाही.
यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनला निवडण्याबाबत रोहित शर्मा
आणि टीमचा मेंटर एमएस धोनी आग्रही होते, त्यामुळे अश्विनचं टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.
रोहित शर्माने अश्विनवर दाखवलेल्या विश्वासामुळे त्याच्या करियरला नवसंजिवनी मिळाली आहे. (IND Vs NZ)

 

Web Title :- IND Vs NZ | ind vs nz r ashwin gets life in limited overs cricket after ravi shastri virat kohli era ended can r ashwin prove himself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा