IND Vs SSL-World Cup 2023 |भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखात एंट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IND Vs SSL-World Cup 2023 | आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या भेदक माऱ्यासमोर लंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं असून भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी दारुण पराभव केला. यासह टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये दणक्यात एंट्री केली आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये सेमी फायनलमध्ये जाणारा भारत पहिला संघ ठरला आहे. (IND Vs SSL-World Cup 2023)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करुन श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरश: लोळवलं. फलंदाजी करताना विराट कोहलीने 88, शुभमन गिलने 92, श्रेयस अय्यरने 82, के एल राहुलने 21, रवींद्र जडेजाने 34, सूर्यकुमार यादवने 12 धावा केल्या.(IND Vs SSL-World Cup 2023)

श्रीलंकेकडून गोलंदाज दिलशान मधुंकाने 5 विकेट्स घेतल्या आणि दुष्मंथा चामीराने एक विकेट घेतली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या 8 विकेट्स घेऊन 357 धावांवर भारताला रोखले. तर भारताने श्रीलंकेसाठी 358 धावांचे आव्हान दिले होते.

श्रीलंकेचा संघ विजयी होण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. मात्र भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी केली. पहिल्या चार ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या 4 विकेट्स घेतल्या.
यात मोहम्मद सिराजने दिमुथ करुणारत्ने व सदीरा समरविक्रमाला शून्यावर आऊट केले.
तर कुशल मेंडिस सिराजच्या गोलंदाजीवर केवळ 1 धाव करुन बाद झाला.
जसप्रीत बुमराहने इंनिंगच्या पहिल्याच बॉलवर पाठुम निस्संकाची विकेट घेतली.
आशा प्रकारे श्रीलंकेची धावसंख्या 3.1 ओव्हर मध्ये 4 बाद 3 धावा अशी होती.
यानंतर मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत 5 विकेट्स घेतल्या.

भारताने श्रीलंकेला विजयसाठी 358 धावांचे आव्हान देऊन केवळ 19.4 ओव्हरमध्ये 55 धावांवर ऑल आउट केले आणि
वर्ल्ड कपच्या इतिहासातील मोठी विजय मिळवला. यासह भारताने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग सात सामने जिंकून
सेमी फायनलमध्ये दणक्यात एंट्री केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले