हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक भरत शहा यांचा तडकाफडकी राजीनामा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक आणि इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक भरत शहा यांनी घरगुती कारण सांगत त्यांच्याकडील विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे इंदापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला आहे. शहा यांच्या राजीनाम्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला तसेच सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्याकडून शहा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

मी माझ्या घरगुती अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजीनामा दिला आहे. नवीन माणसांना सर्व क्षेत्रात संधी मिळावी असे मला वाटते अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिला. सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच ते गेल्या दहा वर्षांपासून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. सन 2012- ते 17 या कालावधीत ते इंदापूर उपनगराध्यक्ष होते.

सध्या ते नगरसेवक आहेत. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत यश खेचून आणण्यात शहा यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करताना शहा परिवाराचे प्रचंड मोठे योगदान आहे. नुसते योगदान नाही तर गरीबांच्या झोपडीतील मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची जमी शहा परिवाराने दान दिली आहे. परंतू, या संस्थेतील अधिकार जाणून बुजवून हिरावून घेतल्यामुळे, चक्क राजकारणाच्या वाटा बंद करून राजीनामे देत शहा यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. यामुळे शहा परिवाराचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मातीमोल झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.