Coronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चा कहर ! बधितांचा आकडा 1000 च्या पुढं !

इंदापूर : इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील एकुण 129 जणांची कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट घेण्यात आली.त्यामध्ये एकुण 29 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 100 निगेटीव्ह आले असुन
बारामती येथील खासगी प्रयोग शाळेत इंदापुर तालुक्यातील 39 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली, त्यापैकी 16 पाॅझीटीव्ह आले असुन 23 निगेटीव्ह आले आहेत. इंदापूर तालुक्याने एक हजाराचा टप्पा पूर्ण केला असुन तालुक्यात दिनांक 4 सप्टेंबर सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकुण 1026 पाॅझीटीव्ह आले असुन त्यापैकी 40 जणांचा मृत्यु झाला असल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळके यांनी दीली आहे.

इंदापूर तालुक्यात 4 सप्टेंबर रोजी 29 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर येथील 79 वर्षीय जेष्ठ नागरिक, 44 वर्षीय पुरूष, बावडा येथील 50 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय जेष्ठ नागरिक, निरवांगी येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक, बाभळगाव येथील 21 वर्षीय युवक, बेलवाडी येथील 11 वर्षीय चिमुरडी, 30 वर्षीय महिला, इंदापूर येथील 30 वर्षीय महीला, 49 वर्षीय महिला, उद्धट येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक, काटी येथील 18 वर्षीय युवक, 32 वर्षीय पुरूष,48 वर्षीय महिला, कालठण नं.2 येथील 21 वर्षीय युवती,खोरोची येथील 25 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 51 वर्षीय पुरूष, हगारवाडी येथील 55 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, अजोती येथील 21 वर्षीय युवक, रूई बाबीर येथील 22 वर्षीय युवक, व कळस येथील 31 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

तर इंदापूर येथील 40 वर्षीय महिला, बेलवाडी येथील 72 वर्षीय जेष्ठ नागरिक, 30 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय लहाण मुलगी, सणसर येथील 42 वर्षीय महिला, बावडा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश असुन बारामती येथील खासगी प्रयोग शाळेतील 16 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये शिरसाटवाडी येथील 28 वर्षीय पुरूष, सणसर येथील 28 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 27 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरूष, ॅ50 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला,अकोले येथील 32 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी (नवीपेठ) येथील 62 वर्षीय पूरूष, अंथुर्णे येथील 33 वर्षीय पुरूष, इंदापूर अंबिकानगर येथील 78 वर्षीय पुरूष, भाभुळगाव राखुंडे मळा येथील 31 वर्षीय पुरूष,वरकुटे खुर्द,शेंडे वस्ती येथील 38 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला, पडस्थळ येथील 36 वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

पूणे जिल्हाधीकारी यांचा दिनांक 3 सप्टेंबर रोजीच्या इंदापूर तालुक्यातील दौर्‍यामुळे इंदापूर शहर व तालुक्यात लाॅकडाउन बंद बाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत असुन त्यातुन फेक अफवा पसरविण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने बंद बाबत तर्क वितर्काला उधाण आल्याचे चित्र आहे. तर प्रशासनाच्या वतीने पुढील काळात इंदापूर तालुका किंवा इंदापूर शहर हे लाॅकडाउन करण्यात येणार नसल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी पोलीसनामा प्रतिनिधीशी बोलताना दीली .तरी नागरांरीकांनी तालुक्यात लाॅकडाउन बाबतच्या अफवावर विश्वास ठेवु नये.लाॅकडाउन बाबत शासन स्तरावरून कसलाही निर्णय कींवा आदेश मीळाला नसल्याने नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवु नये.अफवा पसरवीताना कोणी आढळुन आले तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दीली आहे.