इंदापूर नगर परिषदेला लवकरच अद्यावत रूग्णवाहिका मिळणार – मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना महामारी पूणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यात पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.परंतु नागरिकांनी कोरोनाबाबत गाफील न राहता नियमांचे पालन करावे. व सार्वजनिक ठीकाणी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालण करावे अन्यथा विना मास्क फिरणार्‍यांना पोलीस प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना दीली.

indapur

इंदापूर येथील शासकीय विश्रामग्रहामध्ये शनिवार दि.27 रोजी इंदापूर तालुका कोरोना आढावा बैठक दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली व पूणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली त्यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते.यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना माझे कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत जनजागती करण्याच्या सुचना देण्यात आल्या.तर इंदापूर नगरपरिषदेला सर्व सुविधायुक्त रूग्णंवाहीका देण्यात येणार असल्याची माहीती दत्तात्रय भरणे यांनी दीली.

यावेळी पूणे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पूणे जिल्ह्यात लसीकरणाची तीसरी मोहीम सुरू होत असुन पुढच्या टप्यात जेष्ठ नागरिकांसह 42 हजार नागरिकांना लसीकरणाची सुविधा मिळणार आहे.त्यासाठी ग्रामीण भागामधील ग्रामपंचायत स्तरावर लस सुविधा उपलब्ध होणार असुन या ठीकाणी येण्यासाठी नागरिकांना बसची मोफत सुवाधा उपलब्ध होणार आहे.तर नागरीकांची ग्रामपंचायत स्तरावर नाव नोदणी करण्यात येणार असल्याची माहीती आयुष प्रसाद यांनी दीली.यावेळी भोडणी ता.इंदापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सतीश बाळासाहेब खराडे यांचे वारस पत्नी श्रीमती शोभा सतीश खराडे यांना शासनाकडून मीळणारा एक लाख रूपये आर्थीक मदतीचा चेक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते देण्यात आला.आढावा बैठकीसाठी तालुक्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.