Indapur : अतुल खुपसेच्या प्रतिमेचे राष्ट्रवादीकडून उजणी जलाशयात विसर्जन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –    पूणे, सोलापूर व अ.नगर जिल्ह्याची जिवनदायीनी असलेल्या उजणी जलाशयातील सोलापूर जिल्ह्याच्या हीस्याचे पाच टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात पळविल्याचा खोटा अपप्रचार करून जनमानसात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनारा करमाळा तालुक्यातील समाजकंटक अतुल खुपसे याचे प्रतीमेला चपलांचा हार घालुन माळवाडी नं.2, ता.इंदापूर येथील उजणी जलाशयाच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.व जनमानसात अफवा पसरविणार्‍या समाजकंटक अतुल खुपसे मुर्दाबादच्या घोषणा देवुन जाहिर निषेध नोंदविण्यात आला.

माळवाडी नं.2, ता.इंदापूर, जि.पूणे येथील उजणी जलाशय परिसरामध्ये समाजकंटक अतुल खुपसे याचे प्रतिमेला चपलांचा हार घालुन प्रतिमेला जोडे मारून समाजकंटक अतुल खुपसे याची प्रतिमा उजणी जलाशयामध्ये विसर्जन आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या वतीने अतुल खुपसे मुर्दाबादच्या घोषणा देवुन, पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी युवक कार्यध्यक्ष गणेश भोंग,सचिन खामगळ, सतीश शिंगाडे अध्यक्ष रा.स.प, सौरभ शिंदे, विजय साळुंखे, आण्णा शिंगाडे, धनाजी सलगर, अशोक शिंगाडे, सुखदेव शिंगाडे, सुखदेव कोकाटे यांचेसह आनेक युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.