इंदापूरात प्रधानमंत्री आवास योजनेचा ‘निधी’ अभावी उडाला ‘फज्जा’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) घटक क्र. ४, वयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यासाठी (BLC) योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणारे प्रती लाभार्थी दीड लाख रूपये अणूदाण हप्ता पूर्णपणे रखडल्याने इंदापूरात प्रधानमंत्री आवास योजना, घटक क्र.४ चा पुरता फज्जा उडाला आहे. अणूदाना अभावी शहरातील घरकुलांची बांधकामे अर्धवट स्थितीत पडली असल्याने लाभार्थी हवालदील झालेले असुन इंदापूर शहरातील घरकुल लाभार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याची माहीती घरकुल लाभार्थ्यांनी इंदापूरात बोलताना दीली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत देशातील सर्वांसाठी घरे देण्याचे धोरण केंद्र सरकार व राज्य सरकारने २०१५ मध्ये जाहिर केले आहे. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता राज्य मंत्रीमंडळाने दि. १ डिसेंबर २०१५ रोजीच्या बैठकीमध्ये माण्यता दीलेली आहे. या योजनेअंतर्गत देशात एकूण १९ लाख ४० हजार घरकुल निर्मीतीचे शासनाचे उद्दीष्ट आहे.

सद्य स्थितीत सदर योजना महाराष्ट्र राज्यातील ३८६ स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांच्या नियोजन क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये केंद्र सरकार दीड लाख व राज्य सरकार प्रती लाभार्थी एक लाख रू. अणूदान निधी देणार आहे. यामध्ये राज्यसरकारने प्रती लाभार्थी एक लाख रू. निधी वाटप केलेला आहे. परंतु केंद्र सरकारने हा निधी उपलब्ध करून देण्यास आजवर नूसता ठेंगा दाखविलेला असल्याने घरकुल योजना रेंगाळलेली आहे.

सन २०१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. ४, इंदापूर नगरपरिषदेकडून (BLC) साठी अर्ज मागविण्यात ताले होते.यामध्ये एकूण ४०४ अर्ज नगरपरीषदेला प्राप्त झाले होते त्यापैकी १३६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले होते. त्यामधून ९८ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामास परवानगी देण्यात तालेली आहे. तर ३८ लाभार्थ्यांनी अजून कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही यामध्ये १४ लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण केले आहे. ११ लाभार्थी बांधकाम स्लॅबपर्यंत, २४ बांधकाम लिन्टेल लेवल,२५ बांधकाम जोता लेवलपर्यंत अशी झालेली असुन यामध्ये ४८ लाभार्थ्यांना ४० हजार रूपये प्रती हप्ता याप्रमाणे ३ हप्ते मिळालेले आहेत.

तर ८ लाभार्थ्यांना दोन हप्ते, व २९ लाभार्थ्यांना एकच हप्ता आणी १३ लाभार्थ्यांनी अजून बांधकाम सुरूवाथ केलेली नाही. अशा पद्धतीने अणूदाण वाटप करण्यात ताले असुन यामध्ये राज्य सरकारने त्यांचे हिश्याचे अणूदान लाभार्थ्यांना वाटप केलेले आहे. परंतु केंद्रसरकारने अजून एकही हप्ता दिलेला नसल्याने बांधकामे अर्धवट स्थितीत राहीलेली असुन यामुळे लाभार्थ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत घरकुल लाभार्थी अणूदाण मिळण्यापासुन वंचित राहीले असुन राहते घर पाडून त्याजागी नविन घरे बांधत असताना निधी अभावी कामे रखडल्याने लाभार्थ्यांचे निवार्‍यासाठी हाल होत असुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने लक्ष देवुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती लाभार्थी यांनी सांगीतले.

प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र ४,(BLC) योजनेतील इंदापूर नगरपरिषद हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांसाठी ठरल्याप्रमाणे नगरपरिषदेकडून महाराष्ट्र शासनाचे एक लाख रू. अणूदान वाटप करण्यात आलेले आहे. परंतु राहीलेला दीड लाख रू. हप्ता हा केंद्र सरकारकडून मिळणार असुन अद्याप त्यातला एकही हप्ता केंद्र सरकारकडून न मिळाल्याने लाभार्थ्यांची घरकुल कामे रखडलेली आहेत. सदर निधी प्राप्त होताच सर्व लाभार्थ्यांना अणूदान त्यांचे खात्यावर जमा करण्यात येईल असे इंदापूर नगरपरिषद मुख्याधीकारी ठेंगल यानी सांगीतले.