Independence Day 2022 | नरेंद्र मोदींचा नवा नारा – ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Independence Day 2022 | स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून (Red Fort) राष्ट्रध्वज फडकवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशवासियांना संशोधनावर भर देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या विशेष प्रसंगी मला माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) आणि अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचे स्मरण करायचे आहे. पीएम मोदी (PM Modi) म्हणाले, लाल बहादूर शास्त्रींनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन जय जवान जय किसानचा नारा दिला होता. पुढे अटलबिहारी वाजपेयींनी त्यात जय विज्ञान जोडले. आता देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यात नवीन गोष्टींची भर घालणे आवश्यक आहे. म्हणूनच आता जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानची गरज आहे. (Independence Day 2022)

 

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केवळ भारताच्या कानाकोपर्‍यातच नाही, तर जगाच्या कानाकोपर्‍यात हा तिरंगा अभिमानाने फडकत आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतीय जनतेतील सामूहिकतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंग्याच्या माध्यमातून जगाला समजले आहे. थाळी, टाळ्या वाजवून देशातील नागरिकांनी कोरोना योद्धांना पाठिंबा दिला. यातून चेतना निर्माण झाली. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. संपूर्ण जग आता भारताकडे गर्वाने, अपेक्षेने पहातेय. (Independence Day 2022)

यावेळी, नरेंद्र मोदींनी पहिला संकल्प इप्सित भारत घडवण्याचा सांगितला. तर दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामी नष्ट करायची आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपला वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा. चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक नागरिक येतो. पुढील 25 वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे मोदी म्हणाले. (Independence Day 2022)

 

मोदी पुढे म्हणाले, महात्मा गांधी (Mahatma Gandhi), सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose),
बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे.
प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही.
स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला.
देशासमोर अन्नाच्या कमतरतेपासून ते कोरोनापर्यंत अनेक संकटे आली. देशाला मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले.
मात्र, देशाने कधीही पराभव स्वीकारला नाही. देश सर्व संकटांना सामर्थ्याने आणि ताकदीने सामोरा गेला.

 

Web Title : –  Independence Day 2022 | pm narendra modi gave a new slogan jai jawawan jai kisan jai vigyaan jai ansundhan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा