ब्लॅक फंगसच्या संकटादरम्यान दिलासादायक बातमी ! 10 लाख Amphotericin इंजेक्शन देणार ‘ही’ अमेरिकन कंपनी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाचा कहर सुरू असतानाच ब्लॅक फंगस (Black fungus)ने संकट आणखी वाढवले आहे. देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसची एकुण 11 हजार पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आहेत. तसचे याच्या इंजेक्शनची प्रचंड टंचाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्फोटेरिसिन इंजेक्शन कुठूनही उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आरोग्य विभागाने अनेक देशांशी संपर्क साधला. वृत्त आहे की, अमेरिकेतील गिलियड सायन्सेस बोर्ड, भारतात इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी पुढे आले आहे.

ACB Trap : लाच म्हणून घेतली ‘दारु-मटणा’ची पार्टी; ताव मारत असतानाच अधिकार्‍यांना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं, पुढं झालं असं काही…

 

अमेरिकेतून आतापर्यंत एम्फोटेरिसिन इंजेक्शनच्या 121,000 पेक्षा जास्त बाटल्या भारतात आल्या आहेत. इतर 85,000 बाटल्या मार्गावर आहेत. अमेरिकन कंपनी सुमारे 1 मिलियन डोस पुरवणार आहे. अशाच प्रकारे बाकीच्या देशांशी संपर्क साधला जात आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, ब्लॅक फंगससोबतच्या लढाईत औषध किंवा इंजेक्शनची कमतरता भासू नये.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वर्धामध्ये जेनेटेक लाईफ सायन्सेसने एम्फोटेरिसिन इंजेक्शन तयार केले आहे. आतापर्यंत भारतात एकच कंपनी याचे उत्पादन करत होती. सोमवारपासून या इंजेक्शनचे वितरण सुरू होईल. याची किंमत 1200 रुपये असेल. सध्या ते 7000 रुपयांपर्यंत मिळत आहे.

Pfizer ची लस कधी मिळणार?; पुणेकराचं डायरेक्ट CEO ना पत्र, अन्..

महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत कशी असावी परिस्थिती ? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

वेगाने वाढत आहेत ब्लॅक फंगसच्या केस
ब्लॅक फंगसच्या केस सातत्याने वाढत आहेत. दिल्लीपासून पंजाबपर्यंत, युपी ते राजस्थानपर्यंत याचे रूग्ण समोर येत आहेत. राजस्थानच्या जोधपुरमध्ये ब्लॅक फंगस वेगाने पसरत आहे. येथे आतापर्यंत 44 रूग्ण सापडले आहेत, ज्यांच्यापैकी ती रूग्णांचा मृत्यू झाला, पाच रूग्णांना आपले डोळे गमवावे लागले.

Also Read This : 

Mumbai पश्चिम उपनगर Metro train ची सोमवारी ट्रायल, ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हजर होण्याची शक्यता

Heart Attack Symptoms : ‘या’ 10 लक्षणांच्या मदतीने ओळखा हार्ट अटॅकचा धोका !

नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्ही आंदोलन करू’


केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !