भारत-चीन सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण, अमेरिकेनं दिला ‘ड्रॅगन’ला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर चीनची घुसखोरी पुन्हा एकदा भारतीय जवानांनी उधळवून लावली आहे. चार दिवसात चीनने तीनवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय सैनिकांचा आक्रमकपणा पाहून त्यांना पुन्हा मागे सरकावे लागले. याच कारणामुळे एलएसीवर स्थिती तणावपूर्ण आहे. चीनच्या या घुसखोरीवर अमेरिकेने कडक भूमिका घेतली आहे.

अमेरिकन परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी म्हटले की, आम्ही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि शांततापूर्ण तोडगा निघण्याची अपेक्षा करत आहोत. बीजिंग आपल्या शेजारी आणि अन्य देशांशी सतत खुप आक्रमक पद्धतीने वाद उकरण्याचा प्रयत्न करत आहे, असेही यापूर्वी त्यांनी म्हटले होते.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, तैवान स्टेटपासून शिनजियांग, साऊथ चायना सी पासून हिमालयापर्यंत, सायबर स्पेसपासून इंटल ऑर्गनायजेशनपर्यंत, आम्ही चीनी कम्युनिस्ट पार्टीवर लक्ष ठेवून आहोत, जी आपल्याच लोकांना दबून ठेवू इच्छिते आणि आपल्या शेजार्‍यांना धमकावत आहे. भडकावण्याची या वृत्तीला रोखण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे बिजिंगच्या विरूद्ध उभे राहाणे.

29 ऑगस्टपासून आतापर्यंत चीनने तीनवेळा एलएसीवी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री पँन्गॉग परिसरात घुसखोरी केली. त्यावेळी त्यांना तोडीसतोड उत्तर मिळाले. दुसर्‍यावेळी 31 ऑगस्टला रात्रीसुद्धा चीनी लष्कराने हेल्मेट टॉपवर आगाऊपण केला, ज्यास भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले.

यानंतर 1 सप्टेंबरला चीनी सैन्याच्या जवानांना आपल्या चेपुजी कॅम्पपासून पुढे सरकायचे होते. तेव्हा भारतीय पथकाला याची माहिती मिळताच, त्यांनी तयारी केली. या तयारीची माहिती मिळताच ते बॅकफुटवर गेले. लष्कराच्या धाडसामुळे चीनी सैनिकांना आपल्या कॅम्पवर परतावे लागले.