चीनला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारकडे ‘हे’ 5 पर्याय, ‘ड्रॅगन’ला भारतापुढं झुकावच लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीन जर असा विचार करत असेल की, तो लडाखमध्ये उद्धटपणा करेल, एलएसी बदलण्याचा प्रयत्न करेल आणि भारत काहीच करू शकणार नाही तर चीनची ही मोठी चूक आहे. चीन हे विसरला आहे की 1962 चा भारत आता राहीलेला नाही. हे 2020 चे न्यू इंडिया आहे, जे प्रत्येक वारानंतर पलटवार करते. न्यू इंडियाचा संकल्प आहे की, जर सोडले तर सोडणार नाही. डोकलामपासून गलवान खोर्‍यापर्यंत चीनला याचे उत्तर मिळाले आहे.

चीनविरूद्ध कुटनितीचे हे आहेत पर्याय

पहिला पर्याय : चीनविरूद्ध कडक कारवाई करण्याची रणनिती बनवणे.

दुसरा पर्याय : एलएसीवर चीनला त्याच्या भाषेत उत्तर.

तिसरा पर्याय : चीनच्या विरूद्ध अंतरराष्ट्रीय आघाडी तयार करणे. जे देश चीनच्या विरूद्ध आहेत, त्यांना भारताने सोबत घ्यावे.

चौथा पर्याय : समुद्रामध्ये इंडियन नेव्हीने चीनला घेराव घालावा. दबावाने तोडगा काढण्यास चीन तयार होईल.

पाचवा पर्याय : चीनविरूद्ध भारताने उत्तररादाखल करावाई करावी.

20 ऑक्टोबर 1975 ला अरुणाचल प्रदेशच्या तुलुंग ला मध्ये चीनने असम रायफलच्या पेट्रोलिंग पार्टीवर दगाबाजी करत हल्ला केला होता. यामध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले होते. म्हणजे चीनने तेव्हा सुद्धा त्याची लबाडवृत्ती दाखवून दिली होती आणि आता पुन्हा एकदा चर्चा सुरू असताना हिंसक हल्ला केला आहे, परंतु चीनला आता भारत कायमची अद्दल घडवण्याच्या तयारीत आहे.