India Monsoon Prediction | यावर्षी पाऊस मुबलक पडणार की नाही? मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; ‘एल निनो’चा धोका!

बेंगळुरू : India Monsoon Prediction | भारतात किती आणि कसा पाऊस पडेल याचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे. हवामान अहवाल देणा‍री खाजगी संस्था स्कायमेटने २०२३ चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे, जो खूपच घाबरवणारा आहे (India Monsoon Prediction). यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी असेल, म्हणजेच पहिल्या अंदाजानुसार पाऊस सामान्यपेक्षा कमी होईल (Monsoon 2023).

अल निनो ठोठावणार दार

स्कायमेटने म्हटले आहे की एलपीए म्हणजेच लाँग पीरियड अ‍ॅव्हरेज (Long Period Average) चा ९४ टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग (Skymet Managing Director Jatin Singh) यांनी सांगितले की, ला निना संपल्यानंतर आता एल निनो येत्या काही दिवसांत दार ठोठावणार आहे, त्यामुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने म्हटले आहे की भारतात मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९४% असेल. भारतीय हवामान विभाग सुद्धा लवकरच आपला वार्षिक मान्सूनचा अंदाज जाहीर करू शकतो. (India Monsoon Prediction)

उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता

भारतातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी आपल्या शेतात भात, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीन यांसारखी पिके घेण्यासाठी वार्षिक जून-सप्टेंबरच्या पावसावर अवलंबून असतात. स्कायमेटचा अंदाज आहे की, देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाच्या कमतरतेचा धोका कायम राहिल.

इथे कमी पाऊस पडणार

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भारतातील सुपीक उत्तर भाग, मध्य आणि पश्चिम मैदानी भागात गव्हासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

एल निनो

मान्सूनवर एल निनोचा धोका कायम आहे. यामुळे सरासरीपेक्षा सुद्धा खूपच कमी पाऊस होतो.
अल निनोचा प्रभाव मे ते जुलै दरम्यान दिसून येईल असा अंदाज आहे. एल निनो म्हणजे जेव्हा समुद्राचे तापमान आणि वातावरणात जे बदल होतात त्याच सागरी घटनेला एल निनो म्हणतात.

Web Title : India Monsoon Prediction | india monsoon rains perdition by skymet weather 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP Supriya Sule | अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला