Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ईव्हीएम (EVM) संदर्भात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्या सोबत नुकतीच बैठक पार पडली. यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमबद्दल असलेल्या शंकांचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) दिले. विरोधकांच्या (Maharashtra Politics News) या आक्षेपानंतर सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी ईव्हीएम बाबत घेतलेल्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

माझा ईव्हीएमवर विश्वास आहे, जर इव्हीएममध्ये (EVM) घोळ करता आला असता तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात एखादी गडबड कुणी करु शकत नाही. पराभव झाला की काही लोक ईव्हीएमवर ढकलून देतात, असा टोला परभूत होणाऱ्या उमेदवारांना लगावला. ( Maharashtra Politics News)

अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे

यावर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार हे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सहकारी आहेत. त्यांचा ईव्हीएमवर विश्वास आहे तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपच्या (BJP) भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे

Advt.

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा समाचार घेताना, एकनाश शिंदेंना बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारले पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले. बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 गद्दार आमदारांना आहे. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे, अशी टीका राऊतांनी केली.

Web Title : Maharashtra Politics News | sanjay raut taunt ajit pawar over statement trust evm machine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP Iftar Party | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे इफ्तार पार्टी

Pune BJP’s Savarkar Gaurav Yatra | देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! कोथरुडकरांचा निर्धार;
भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

TDM Marathi Movie | बॉलीवूडच्या बरोबरीनं मराठी चित्रपट टीडीएमचं पोस्टर मुंबईत झळकलं..!