CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या मंत्री, सर्थक आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अयोध्या दौरा (Ayodhya Tour) केला. रामलल्लाच्या दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) सर्व आमदार, खासदार, नेते अयोध्येला गेले होते. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार आम्हीच पुढे घेऊन जात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आमदार करत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या (Hindutva) विचारधारेवर चालत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भविष्यात शिंदे (Shinde Group) – ठाकरे गट (Thackeray Group) पुन्हा एकत्र येणार का? यासंदर्भात स्पष्ट शब्दात मत मांडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, भविष्यात ठाकरे-शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही. आम्ही हिंदुत्ववादी विचारधारेवर पुढे जात आहोत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. 2019 मध्ये हिंदुत्वाची समान विचारधारा असणाऱ्या भाजपसोबत (BJP) आमची नैसर्गिक युती झाली होती. मात्र निकालानंतर ही युती तोडून त्यांनी (उद्धव ठाकरे) काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार बनवले. ज्यांनी राम मंदिर बांधकामाला विरोध केला होता असंही शिंदे यांनी सांगितले.

याशिवाय कोण काम करते आणि संकटाच्या काळात त्यांच्यासोबत कोण उभं राहते हे शिवसैनिकांना माहित आहे.
मूळ शिवसैनिक (Shiv Sainik) आमच्या सोबत असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
तसेच सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सध्या जी सुनावणी झाली.
त्याचा निकाल जो काही असेल तो संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत असेल.
कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Web Title : CM Eknath Shinde | will the two factions of shivsena uddhav thackeray eknath shinde unite in future cm eknath shindes big statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP Iftar Party | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे इफ्तार पार्टी

Pune BJP’s Savarkar Gaurav Yatra | देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! कोथरुडकरांचा निर्धार;
भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

TDM Marathi Movie | बॉलीवूडच्या बरोबरीनं मराठी चित्रपट टीडीएमचं पोस्टर मुंबईत झळकलं..!