MP Supriya Sule | अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) विरोधकांनी अदानी समूह याबाबत (Adani Group) आक्रमक पवित्रा घेतला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी वेगळी भूमिका मांडली. अदानी समूहाला ठरवून लक्ष्य केलं जात असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच त्यांनी जेपीसी (JPC) चौकशीच्या मागणीला देखील विरोध केला. यावरुन आता विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरु झाली असून, याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना हा फूट होण्याचा मुद्दा नाही असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सांगितले.

काय म्हणाले होते शरद पवार?

हिंडेनबर्ग अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरून संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत बराच काळ कामकाज झाले नाही. त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यानंतर संयुक्त चिकित्सा समितीची मागणी लावून धरणे योग्य नाही. अहवालाच्या मुद्द्यावरून देशभरात गोंधळ झाला आणि त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) चुकवावी लागली, असे मत शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

हा फूट होण्याचा मुद्दा नाही – सुप्रिया सुळे

शरद पवार यांच्या भूमीकेवरुन विरोधकांमध्ये फूट पडली आहे असा प्रश्न सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)
यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, हा फूट होण्याचा मुद्दा नाही आहे.
महागाई आहे किंवा नाही, या प्रश्नावरुन आमच्यात फूट पडेल.
पण, महागाई, बेरोजगारी, कांद्याचे भावावरुन आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
त्यामुळे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, हे सगळ्यांना समजले पाहिजे. अदानींची चौकशी सुरू आहे.
परंतु आज दूधाचा भाव सर्वांसाठी महत्वाचे नाही का? दूध आयात केले, तर शेतकऱ्यांचे काय हाल होतील?
शेतकऱ्यांना हे परवडणारे आहे का? आधीच शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहे.
दूधाच्या आयतीसंदर्भात बातमी वृत्तपत्रात आल्यावर शरद पवारांनी तातडीने केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले,
अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

Web Title : MP Supriya Sule | ncp mp supriya sule reaction over sharad pawar stand on adani group jcp enquiry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला