‘इस्रो’ची अवकाशात ‘झेप’,आता भारत स्वतःचे ‘स्पेस स्टेशन’ बनवणार

नवी दिल्ली :  वृत्त संस्था – दोनच दिवसांपूर्वी मोदी सरकारने अवकाश युद्धसज्जतेसाठी ‘अंतराळ संशोधन संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंतराळ संशोधनाच्या संदर्भात आणखी एका महत्त्वपूर्ण घोषणा ISRO प्रमुख डॉ. के सिवन यांनी केली आहे. भारत आता आपले स्वतःचे ‘अंतराळ स्थानक’ बनविण्याची योजना तयार करत असल्याची हि घोषणा आहे.

हा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘गगनयान मिशन’ च्या विस्ताराचेच पुढचे पाउल असेल. सिवन यांच्या म्हणण्यानुसार आपल्या मानवीय अंतराळ मिशन योजनेच्या सुरुवातीनंतर गगनयान कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी भारताने आपले स्वतःचे अंतराळ स्थानक बनविण्याची योजना तयार केली आहे.

मागील वर्षी नरेंद्र मोदींनी गगनयान प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर भारताच्या अंतराळ संशोधनास वेग आलेला आहे .याआधी इस्रो प्रमुखांनी सांगितल्यानुसार भारताने डिसेंबर २०२१ पर्यंत अंतराळात सजीव मानव पाठविण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे आणि आपल्या गगनयान प्रकल्पाच्या मदतीने असे करणे शक्य होणार आहे.

जर ठरविलेल्या वेळेत आपण हे ध्येय्य पूर्ण केले तर अंतराळप्रवाशांना अंतराळात पाठवू शकणार भारत हा जगातील चौथा देश असेल. सिवन यांनी असेदेखील सांगितले होते कि भारत यावर्षी लवकरच चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाच्या तयारीत आहे.

काय आहे चांद्रयान २ :
याआधी भारताने घोषित केल्यानुसार ‘चांद्रयान २’ पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने १५ जुलैच्या मध्यरात्री प्रक्षेपित केले जाईल. या प्रक्षेपणासाठी सध्या इस्रो ३.८ टन वजनाच्या उपग्रह निर्मितीस अंतिम रूप देत असून यासाठी भारताने ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

प्रक्षेपणानंतर काही आठवड्यात ‘चांद्रयान २’ चंद्राच्या दक्षिण भागावर उतरेल. विशेष म्हणजे हा चंद्राचा असा भाग आहे जेथे आत्तापर्यंत कोणताही देश किंवा अंतराळयान पोहचू शकलेले नाही. हे भारताचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक जटिल आणि गुंतागुंतीचे मिशन असून भारत १००० कोटी रुपयांपेक्षाही कमी खर्चात हे मिशन पूर्ण करेल.

आरोग्य विषयक वृत्त –

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय