India Post GDS Recruitment 2021 : पोस्ट विभागात निघाली भरती, 10 वी पास असलेल्यांनी करावा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत नोकरीचे स्वप्न पाहणार्‍यांसाठी खुशखबर आहे. पोस्ट विभागाने ग्रामीण डाक सेवकच्या शेकडो पदांवर भरती काढली आहे. या व्हॅकन्सी अंतर्गत योग्य आणि इच्छूक उमेदवार 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशननुसार, दिल्लीत पोस्टल सर्कलमध्ये एकुण 233 पदांवर भरती काढली आहे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 27 जानेवारी 2021
ऑनलाइन अर्जासाठी शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021

वर्गाच्या आधारे व्हॅकन्सी
सामान्य वर्ग- 99 पदे
EWS वर्ग- 17 पदे
OBC वर्ग- 62 पदे
PWD-A वर्ग- 02 पदे
PWD-B वर्ग- 02 पदे
PWD-C वर्ग- 01 पदे
PWD-DE वर्ग- 01 पदे
SC वर्ग- 37 पदे
ST वर्ग- 12 पदे

पात्रता
या व्हॅकन्सी अंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाचे गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयासह 10वी पासचे सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या आधारावर तयार केल्या जाणार्‍या मेरिटच्या आधारावर होईल.

ग्रामीण डाक सेवकच्या दिल्ली सर्कल व्हॅकन्सीसाठी 18 वर्षापासून 40 वर्षाच्या वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. वयाचा हिशेब 27 जानेवारी 2021 पर्यंत वयाच्या आधारवर केला जाईल.

वेतन
दिल्ली पोस्टल सर्कल जीडीएस व्हॅकन्सी 2021 अंतर्गत ग्रामीण डाक सेवकच्या 233 पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन 10000 प्रति महिना असेल. मात्र, जीडीएस बीपीएमच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 12,000 रुपयांपासून 14,500 रुपयांपर्यंत प्रति महिना वेतन मिळेल. तर जीडीएस एबीपीएमसाठी 10,000 रुपयांपासून 12,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क
सामान्य/ओबिसी/ईडब्ल्यूएस/पुरुष उमेदवारांसाठी – 100 रुपये
एससी/एसटी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क असणारा नाही.